khadan police arrested three near akola. saam tv
महाराष्ट्र

Crime News : किर्तनकाराचे अपहरण करुन उकळले दीड लाख; अकोल्यातील तिघे अटकेत

या तिघांनाही आता न्यायालयात हजर करण्यात येणार असून नेमके कशासाठी आणि का अपहरण केले याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

जयेश गावंडे

अकाेला : पैशासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. अकोल्यातील (akola) तिघांनी पैशासाठी एका कीर्तनकार महाराजाचे अपहरण केल्याची घटना नुकतीच उघडीकस आली आहे. अकोल्यातील (akola) खदान (khadan) पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. साडे सात लाखासाठी तिघांनी मिळून एकाचे अपहरण केले. या तिघांनाही खदान पोलिसांनी बेड्या ठोकल्या (arrest) आहेत. (akloa latest marathi news)

पृथ्वीराज उर्फ पप्पू ठाकूर, वेदांत साबळे आणि हृषिकेश पातोंड अशी तिघा संशयित आरोपींची नावे आहेत. या तिघांनी कीर्तनकार असलेल्या प्रशांत ढेंगळे यांचे पैशासाठी अपहरण केल्याची माहिती पाेलिसांच्या सूत्रांनी दिली.

प्रशांत ढेंगळे यास एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे बंधूस साडे सात लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यापैकी दीड लाखांची रक्कम अपहरणकर्त्यांना देण्यात आली. या प्रकरणी हृषिकेश ढेंगळे याने खदान पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

Heel Pain: दररोज हिल सॅंडल घालता? संध्याकाळी 'हे' घरगुती उपाय करा, पायदुखी दूर राहील

Marathi bhasha Vijay Live Updates : थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

SCROLL FOR NEXT