Kerala Governor News  saam tv
महाराष्ट्र

जेव्हा गुलामी होती, तेव्हा सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकले; केरळच्या राज्यपालांचं मोठं विधान

भारताचा नागरिक आजही स्वतंत्र आत्मा आहे. येथे कोणीच तोंड बंद करू शकत नाही, असे मत केरळचे (Kerala) राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.

साम टिव्ही ब्युरो

मोबिन खान

Kerala Governor News : 'जेव्हा गुलामी होती, तेव्हा सु्द्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकले होते. हीच भारताची संस्कृती आहे. भारताचा नागरिक आजही स्वतंत्र आत्मा आहे. येथे कोणीच तोंड बंद करू शकत नाही, असे मत केरळचे (Kerala) राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (arif mohammad khan) यांनी व्यक्त केले. (kerala governor arif mohammad khan big statement freedom of expression)

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. खान म्हणाले, 'एखाद्या मुक्या माणसाला खीर दिल्यावर कशी लागली हे विचारा. त्याच्या ज्या भावना असतील तसं मला दर्शन घेतल्यावर वाटत आहे'.

कट्टरपंथींवर भाष्य करताना म्हणाले, मी कधी कोणाविरुद्ध आवाज बुलंद केला नाही. भारताची संस्कृती कायम समन्वयाची आहे. आपली एकता निर्माण करणारी आपली संस्कृती आहे. भारतातील संतांनी कधी हे माझे विचार आहे, असं सांगितलं नाही. मूलभूत सिद्धांतावर जेव्हा धूळ येते, ती काढण्याचे काम संतांनी केलं आहे. साईबाबा या संस्कृतीचे महान प्रवक्ते राहिले आहेत'.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाविषयी भाष्य करताना राज्यपाल खान म्हणाले,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात जितका आनंद घेऊ, तितका कमी आहे. आपलं स्वातंत्र्य आणि संस्कृती मूल्यवान आहे. त्यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने सतत सजग राहिले पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Vastu Tips: चपात्या मोजून बनवता? वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात येऊ शकते नकारात्मक ऊर्जा

Maharashtra Live News Update : ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने विकणाऱ्या फस्ट कॉफी शूज वर पोलिसांची धाड

Viral Video: वय १०३ वर्ष पण अंगी जिद्द आणि चिकाटी; आजींचा चहाच्या टपरीवरील संघर्ष पाहून युजर्स भावूक

Designer Saree Type: यंदाच्या लग्नसराईसाठी ट्राय करा या ७ ट्रेंडी युनिक पण अंगाला न चरचरणारी डिझायनर साडी

दररोज वापरण्यासाठी परफेक्ट आहेत चार्म ब्लॅक बीड्स पैंजण; पहा खास डिझाइन्स

SCROLL FOR NEXT