वाशिम : सत्तास्थापनेच्या एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला. शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात बंडखोर आमदार संजय राठोड यांनी स्थान मिळालं. राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने बंजारा समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोहरादेवी येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या महाआरतीनंतर मंहत जितेंद्र महाराज यांनी पत्रकार परिषद घेत संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांना इशारा दिला आहे. (washim news In Marathi )
जितेंद्र महाराज महंत म्हणाले, 'भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आमदार संजय राठोड यांच्या विरोधात वक्तव्य केलं, त्यामुळे राज्यभरातील बंजारा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. संजय राठोड यांच्या विरुद्ध असेच वक्तव्य सुरूच राहिले,तर राज्यभरातील १२ कोटी बंजारा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही'.
'एकीकडे संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी 'क्लीन चिट' दिली असतांना विनाकारण काही जण संजय राठोड यांच्या विरोधात बोलत आहेत.त्यामुळं हे थांबले नाही, तर येत्या दोन दिवसांत बंजारा समाज घरात बसणार नाही. ज्या मुलीच्या आत्महत्येचं प्रकरण लावून धरत आरोप केले जात आहेत.
सदर प्रकरण 23 एप्रिल ते 23 मे पोलीस आयुक्त पुणे यांनी प्रसिद्ध पत्रक काढलं. त्यावेळी एका महिन्यात कोणीही तक्रार केली नाही, म्हणून 23 मे रोजी पोलीस प्रशासनाने ऑर्डर काढून हे प्रकरण निकाली काढलं. जो दुर्देवी आघात झाला, तो निकाली निघाला आहे.त्यामुळं आरोप करणाऱ्यांनी समजून घ्यावं, असेही महंतांनी सांगितलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.