Aadhaar Card Saam TV
महाराष्ट्र

Aadhaar Card : तुमच्या आधार कार्डची माहिती अशी करा सुरक्षित; जाणून घ्या, नवे नियम

साम टिव्ही ब्युरो

Aadhaar Card : ऑनलाईन पद्धतीने फसवणूकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. प्रत्येक बॅंकेचे किंवा कोणतेही आर्थिक व्यवहार करताना आपल्याला पॅनकार्ड, आधार कार्ड मागितले जातात. आधार कार्डवर आपली संपूर्ण माहिती नमूद असते. अनेक ठिकाणी या माहितीचा गैरवापर करून फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता तुम्हाला अशा पद्धतीने होणाऱ्या फसवणूकीपासून स्वत:ला वाचवता येणार आहे. यूआयडीएआयने यासाठी काही नियम आणि हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. (Aadhar Card)

आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने शुक्रवारी या नियमांत बदल केला आहे. यात जेव्हा तुम्ही पॅन किंवा आधार वापरत असाल तेव्हा कशा पद्धतीने सतर्क राहिले पाहिजे या विषयीची सर्व माहिती देण्यात आली आहे. आधार कार्ड नंबर हा प्रत्येक रहिवाशाचा डिजिटल नंबर आहे. त्यामुळे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने ओळख पडताळणी करताना याचा वापर केला जातो. त्यामुळे पुढील गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे.

आधार लॉक करा

काही कारणास्तव आपल्याला काही काळ आधार वापरण्याची गरज नसते. जर तुम्हाला याची आधीच माहिती असेल तर तुम्ही बायमॅट्रीक लॉक करून ठेवू शकता. या काळात तुम्हाला आधार वापरता येणार नाही.

व्हीआयडी जनरेट करणे

जर तुम्हाला आधारचा तपशील शेअर करयचा नसेल तर तुम्ही यूआयडीएआयद्वारे व्हीआयडी तयार करू शकता. माय आधारच्या वेबसाईटवर तुम्हाला हे तयार करता येईल. यात तुम्हाला दिनांक निवडण्याचा पर्याय असतो. निवडलेला दिवस संपल्यावर तु्म्ही व्हीआयडीमध्ये बदल करू शकता.

ऑथेंटिकेशन हिस्ट्रीकडे लक्ष द्या

यूआयडीएआय या संकेतस्थळावर तसेच आधार अॅपवर हिस्ट्री तपासता येते. यात गेल्या ६ महिन्यांपर्यंतची हिस्ट्री मिळते. जर तुमचे आधार कार्ड इमेलशी लिंक असेल तर याचा जास्त फायदा होतो. यात तुम्हाला आधार वापरताना नेहमी एक मॅसेज प्राप्त होतो.

हेल्पलाईन क्रमांक

आधार कार्ड विषयी कोणतीही शंका आल्यास तुम्ही लगेचच यूआयडीएआयचा टोल फ्री हेल्पलाईन नंबर १९४७ वर संपर्क साधू शकता. तसेच help@uidai.gov.in या इमेल आयडीवर मेल करू शकता. हेल्पलाईन नंबरची सेवा २७ तासांसाठी उपलब्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT