KDMC DECLARES HOLIDAY FOR ALL SCHOOLS IN KALYAN-DOMBIVLI AMID HEAVY RAIN ALERT 
महाराष्ट्र

ठाणे, कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळांना सुट्टी; अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर KDMCचा निर्णय

KDMC Announces School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा मिळाल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • केडीएमसीने कल्याण-डोंबिवलीतील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर केली.

  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

  • नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे

संघर्ष गांगुर्डे, साम प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. मुंबई आणि उपनगरातही पावसाने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. अशातच आता उद्याही राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीतही अतिवृष्टीच्या इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी असणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना आदेश जारी केले आहेत. प्रशासनाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सुट्टीची माहिती तात्काळ पालकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रशासनाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सुट्टीची माहिती तात्काळ पालकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सकाळच्या सत्रातील विद्यार्थी शाळेत पोहोचल्यास त्यांना सुरक्षितपणे घरी पाठविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही केडीएमसी शिक्षण विभागाकडून शिक्षण अधिकारी भारत बोरनारे यांनी दिले आहेत.

ठाणे प्रशासनाचा मोठा निर्णय

ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. शहरातील सखल भागात पाणी साचलंय. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यासह जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. धबधबे, धरणे, तलाव आणि इतर पर्यटनस्थळावर प्रवेश बंद करण्यात आलेत.

उल्हासनगरमधील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी

अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने हा निर्णय घेण्यात आला. शिक्षण विभागाने याबाबत सर्व मुख्याध्यापकांना आदेश जारी केले असून सुट्टीची माहिती तात्काळ पालकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सकाळच्या सत्रातील विद्यार्थी शाळेत आल्यास त्यांना सुरक्षितपणे घरी पाठविण्याचे निर्देश शिक्षण अधिकारी किशोर गोसावी यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉर्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी गोळ्या-औषधांऐवजी करा ही 6 योगासने, एकदम फिट राहाल

Pune BJP : पुण्यात भाजपचा 'ट्रिपल स्ट्रोक'! निवडणुका नसतानाही तिघांचा पक्षात प्रवेश

Heart Attack : महिलांनो! 'या' वयानंतर वाढतो हार्ट अटॅकचा धोका, ३ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

भीषण अपघात! बस उलटल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग; BKC आणि सूरत स्टेशनचे बांधकाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT