Manasvi Choudhary
आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावयुक्त जीवनशैलीमुळे हार्टअटॅकचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
तरुण वयातही हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल आणि औषधोपायांशिवाय नैसर्गिकरीत्या फिट राहायचे असेल, तर योगासने तुम्ही करू शकता..
ताठ उभे राहून दोन्ही हात वर करून श्वास घेत शरीराला वरच्या दिशेने ताणा. ताडासन केल्याने शरीराचा ताण कमी होतो, हृदयावरचा ताण नियंत्रित राहण्यास मदत होते
एका पायावर उभे राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवून दुसऱ्या पायाच्या मांडिवर ठेवा आणि दोन्ही हात नमस्कार मुद्रेत डोक्यावर आणा. वृक्षासन हा योगा केल्याने मानसिक एकाग्रता वाढवते रक्तदाब नियंत्रणात राहतो.
पोटावर झोपून छातीच्या बाजूला दोन्ही हात ठेवून शरीराचा वरचा भाग सापाच्या फणीसारखा वर उचला. या योगासनामुळे हृदयाकडे होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो.
जमिनीवर सुखासनात किंवा पद्मासनात बसून दोन्ही हात पाठीमागे एकमेकात अडकवून ताणा. हा योगासन छाती, खांदे आणि फुफ्फुसांच्या स्नायूंसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे, ज्यामुळे श्वसनाचा त्रास कमी होतो.
पाठीवर सरळ झोपुन दोन्ही हात व पायांमध्ये अंतर ठेवा आणि संपूर्ण शरीराला सैल सोडून डोळे बंद करा. शवासन योगासन केल्याने हृदयाची गती सामान्य होते, मन शांत होते आणि संपूर्ण शरीराला आराम मिळतो