Manasvi Choudhary
उद्या १७ ऑगस्ट रोजी नागपंचमी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो.
नागपंचमी या सणाला नागदेवतेची पूजा केली जाते. घरोघरी नागाची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो.
नागपंचमी या सणानिमित्त तुम्ही दारात रांगोळी काढा यामुळे घराची शोभा वाढेल. नागपंचमी निमित्त दारात काढण्यासाठी सोप्या आणि आकर्षक 5 रांगोळ्या कोणत्या ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
नागपंचमी या सणानिमित्त तुम्ही शुभेच्छा रांगोळी काढू शकता. अश्या पद्धतीने तुम्ही रांगोळी काढून त्यावर शुभ नागपंचमी असे लिहा.
ताज्या फुलांची किंवा पानांची रांगोळी तुम्ही काढू शकता. रांगोळीच्या मधोमध नागदेवतेचे चित्र काढून आजूबाजूला गोल वर्तुळात सुंदर पानांची नक्षी काढावी.
नागपंचमीला नागाची रांगोळी काढणे सर्वाधिक शुभ मानले जाते. अश्या पद्धतीने तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.
नागपंचमीनिमित्त तुम्ही शिवलिंग, डमरू, नाग या रांगोळ्या काढा ज्यामुळे घराची शोभा वाढेल.