Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात महिनाभर कांदा- लसूण खाणे टाळले जाते.
कांदा- लसूण न खाण्यामागे अनेक धार्मिक कारणे आहेत. मात्र कांदा- लसूण न खाल्ल्याने शरीरावर नेमके कोणते परिणाम होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
कांदा आणि लसूण हे तामसिक गुणधर्मासाठी ओळखले जाते. त्यामुळे उष्ण असल्याने ते खाल्ल्याने पचन क्रिया बिघडू शकते त्यामुळे ते न खाल्ल्याने पोटावर अतिरिक्त ताण येत नाही, ज्यामुळे अपचन, गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास दूर होतो.
लसूण आणि कांद्याचे सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. पावसाळ्यात वातावरणात आधीच दमटपणा आणि संसर्गाचा धोका असतो, अशा वेळी हे पदार्थ न खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.
महिनाभर कांदा-लसूण न खाल्ल्याने हलके जेवण जेवल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
श्रावणात पालेभाज्यांसोबतच जड अन्न टाळून साध्या मुगाची खिचडी, वरण-भात किंवा ताजे अन्न घेतल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.