Sangola Varad Viral Video Saam TV
महाराष्ट्र

काय ते रस्ते, काय ते खड्डे, काय तो चिखल, शाळेला कसं जायचं?, सांगोल्यातील मुलाचा VIDEO व्हायरल

शाळेला कसं जायचं असा सवाल सांगोल्यातील एका चिमुकल्याने उपस्थित केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सांगोला : गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. पावसामुळे रस्ते जलमय झाले असून नदी नाल्यांना पूर आलाय. सोलापूरातील (Solapur) सांगोला तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता हेच कळत नाही. अशातच शाळेला कसं जायचं असा सवाल सांगोल्यातील एका चिमुकल्याने उपस्थित केला आहे. (Sangola Student Viral Video)

सोलापुरातील सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलं असून रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता हेच कळत नाही. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून जावे लागत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

सांगोला तालुक्यातील अकोला ते वासूद या दरम्यानच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने तो खड्डा आहे की पाणी याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यातच या रस्त्यावरून शाळकरी मुलं शाळेला जात असल्याने अशा खड्डयातून आम्ही शाळेला जायचं कसं असा सवाल येथील शाळेत जाणाऱ्या वरदने उपस्थित केला आहे. (Solapur Sangola Marathi News)

जवळपास एका मिनिटाच्या या व्हिडिओत हा चिमुकला रस्त्यावर किती खड्डे पडले आहे, याची कैफियत मांडत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंत दर्शवली आहे. सांगोला हा शहाजीबापू पाटील यांचा मतदारसंघ असल्याने नेटकरी काय ते खड्डे काय ते रस्ते काय ते पाणी असं म्हणत शहाजीबापूंना याकडे लक्ष घालण्याची मागणी करत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

SCROLL FOR NEXT