Rahul Deshmukh Arrest  Saam tv
महाराष्ट्र

Rahul Deshmukh Arrest : शेकाप नेते राहुल देशमुख यांना अटक, पोलीस स्टेशनजवळ कार्यकर्त्यांचा जमाव

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये पोलिसांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते राहुल देशमुख यांना अटक केली आहे. राहुल देशमुख यांनी एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी एका विशिष्ट समाजाच्या विरोधात संशय निर्माण होईल आणि सामाजिक सलोखा बिघडेल अशा आशयाचे पत्रक काढलं होतं. तसेच त्यांनी हे पत्रक परिसरात वाटलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे स्थानिक नेते राहुल देशमुख यांना अटक करण्यात आली. विभागातील एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी विशिष्ट समाजाच्या लोकांविरोधात सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या आशयाचं पत्रक काढलं. त्यानंतर हे पत्रक काटोल परिसरात वाटले.

तसेच त्यांनी तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी आज सायंकाळी देशमुख आणि इतर नेत्यांनी कॅण्डल मार्चचे आयोजन केलं होतं. त्यानंतर राहुल देशमुख यांची कृती सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडवणारी आहे, असा ठपका पोलिसांनी ठेवला. त्यानंतर पोलिसांनी आज सकाळी सहा वाजता राहुल देशमुख यांना अटक केली.

राहुल देशमुख यांना अटक केल्यानंतर काटोल पोलीस स्टेशनच्या समोर राहुल देशमुख यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. मात्र, काटोल पोलीस स्टेशन समोर स्थिती तणावाती आहे. मात्र, पूर्णपणे नियंत्रणात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT