kas pathar file photo
kas pathar file photo saam tv
महाराष्ट्र

येत्या रविवारी 'कास पठार' ला जायचा प्लॅन केलाय ?थांबा ! ही बातमी वाचा

Siddharth Latkar

Kass Pathar : येत्या रविवारी (ता. 18) सातारा शहरात हिल हाॅफ मॅरेथाॅन (satara hill half marathon) स्पर्धा हाेणार आहे. ही स्पर्धा सकाळी सहा ते दहा या कालावधीत हाेणार असल्याने स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आल्याची माहिती वाहुतक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक व्ही. ए. शेलार यांनी दिली.

या स्पर्धेत सुमारे आठ हजार स्पर्धक धावण्याची शक्यता असल्याने त्यांना प्राेत्साहन देण्यासाठी माेठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पर्धक व नागरिकांच्या दृष्टीने सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीचे नियमन व वाहनांचे पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी एसपी अजय कुमार बन्सल यांनी उपयायाेजनांचे आदेश दिले आहेत. दरम्यान कास पठार पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांना सकाळी अकरानंतरच यवतेश्वर घाटात प्रवेश मिळणार आहे.

पाेलीस कवायत मैदान, पाेवई नाका , मरिआई काॅम्पलेक्स, शाहू चाैक, अदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर, बाेगदा, यवतेश्वर, प्रकृती हेल्थ रिसाॅर्ट या मार्गावर केवळ रुग्णवाहिका, पाेलीस वाहने, अग्निशामक दल या वाहनांना परवानगी राहील. अन्य सर्व वाहनांना स्पर्धा कालावधीत प्रवेश बंद राहील असे पाेलिस दलानं कऴविलं आहे.

वाहतुक मार्गातील बदल

शिवराज पेट्राेल पंप, अंजठा चाैक व गाेडाेली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी.बी.कदम मार्केट , राधिका सिग्नल येथून सातारा शहरात ये-जा करतील.

बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकातून सातारा शहरात येणारी सर्व वाहनं जिल्हा परिषद चाैक, कनिष्क हाॅल चाैक, रिमांड हाेम मार्गे, जूने उप्रादेशिक परिवहनकार्यालय अथवा बांधकाम भवन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चाैक, मुथा चाैक, रिमांड हाेम मार्गे , जूने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय ते नेताजी सुभाषचंद्र बाेस चाैक मार्गे सातारा शहरात ये जा करतील.

मुख्य बसस्थनाक, राधिका सिग्नल, तहसिल कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्गकडे जाणारी सर्व वाहने ही ग्रेड सेपरेटर मार्गाने सातारा शहाराच्या बाहेर जातील.

सज्जनगड, ठाेसेघर, परळीकडून येणारी - ाणारी सर्व वाहने ही शेंद्रे मार्गे खिंडवाडी रस्त्याने शिवराज पेट्राेल पंप, अंजठा चाैक व गाेडाेली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी.बी.कदम मार्केट , राधिका सिग्नल येथून सातारा शहरात ये-जा करतील.

कास बाजूकडून सातारा शहर बाजूकडे येणारी वाहने मॅरेथाॅन स्पर्धा संपेपर्यंत प्रकृती हेल्थ रिसाॅर्ट बाजूकडून सातारा बाजूकडे येणार नाहीत. ती पर्यायी मार्गाने एकीव फाटा , एकीव , माेळेश्वर , कुसुंबीमुरा, कुसुंबी , मेढा मार्गे सातारा शहराकडे येतील.

पार्किंगची व्यवस्था

हिल हाॅफ मॅरेथाॅन स्पर्धेसाठी येणारे स्पर्धकांनी व नागरिकांनी त्यांची वाहनं प्रशासकीय इमारतीचे समाेरील माेकळ्या मैदानामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद मैदान रस्त्यांचे दाेन्ही बाजूस, जूने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय ते नेताजी सुभाषचंद्र बाेस चाैक, करंजेनाका रस्त्यावर दक्षिण बाजूस लावावीत असेही पाेलीस दलानं कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

Manoj jarange Patil: 'दिलेला त्रास विसरु नका, मतांमधून ताकद दाखवा', जरांगे पाटलांचे आवाहन; विधानसभेबाबत केली मोठी घोषणा!

Fashion Beauty Tips : 'हे' ५ दागिने महिलांकडे असलेच पाहिजेत; ऑफिससह, लग्नसमारंभात तुम्हीच दिसाल उठून

SCROLL FOR NEXT