kasara Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Accident News: १० जणांना घेऊन जाणारी जीप १५० फूट खोल दरीत कोसळली, कसाऱ्यात भीषण अपघात

Kasara Jeep Accident: कसाराहून खोडाळ्याच्या दिशेने जात असताना, जीपचा भीषण अपघात झालाय. जीपची वैतरणा पुलावरील लोखंडी कठड्याला धडक बसली. या धडकेत जीप वैतरणा धरणाच्या जलाशयात कोसळली.

Bhagyashree Kamble

फयाज शेख, साम प्रतिनिधी

कसाराहून खोडाळ्याच्या दिशेने जात असताना, एका जिपचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली जीप कसाराच्या मालगावातून खोडाळा येथे जात होती. त्यादरम्यान, वैतरणा पुलावरील लोखंडी कठड्याला धडक बसली. या धडकेत जीप वैतरणा धरणाच्या दरीत कोसळली. जीप दरीत कोसळल्यानं १० जण जखमी झाले असून, १० जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

वैतरणा धरणाच्या जलाशयातील दरीत जीप कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर १० जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. प्रवाशांनी भरलेली जिप कसारा मालगावातून खोडाळा येथे जात होती. याच मार्गावरून जात असताना, जीपची वैतरणा नदीवरील पुलावरील लोखंडी कठड्याला धडक बसली. ही धडक इतकी जोरात बसली की जीप थेट १०० ते १५० हून अधिक उंचीवरून खाली कोसळली.

जीपमध्ये एकूण १० प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. तसेच एक कुटुंब कामानिमित्ताने खोडाळा येथे आपल्या नातेवाईकांकडे जात होते. या दरम्यान, वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाजवळ जिप चालकाचा अचानक ताबा सुटला. जीप चालकाचा ताबा सुटल्यानं जिप थेट वैतरणा धरणाच्या जलाशयात खोल दरीत कोसळली.

घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत जीपमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जिपमधून १० प्रवाशांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं. ग्रामस्थांनी तातडीने जखमींना कसारा येथील खासगी रूग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र उपचारानंतर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How to Reduce Cholesterol: फक्त 7 दिवसांत कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात लगेच करा हे 4 बदल

मनसेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: राज ठाकरे 28 आणि 29 या दोन दिवसाच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्यावर

Famous Actor Death : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Shengdana Chutney Recipe : हिवाळ्यात गरमागरम भाकरीसोबत हवीच शेंगदाण्याची चमचमीत चटणी, वाचा अस्सल पारंपरिक रेसिपी

SCROLL FOR NEXT