Karuna Sharma Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Election: करुणा शर्मा लढणार कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुक

कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली

संभाजी थोरात साम टीव्ही कोल्हापूर

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याचे (Kolhapur) लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची ही जागा रिक्त झाली आहे. या पोटनिवडणुकीचा (election) कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता १२ एप्रिल दिवशी मतदान होणार असून १६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. या दरम्यान या पोटनिवडणुकीकरिता रंगत येत असून या रणांगणात आता करुणा शर्मा यांनी देखील लढणार आहे. धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) केलेल्या आरोपांनंतर (allegations) चर्चेमध्ये आलेल्या करुणा शर्मा आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत.

हे देखील पहा-

आगामी कोल्हापूर (Kolhapur) पोटनिवडणुकीमध्ये त्या शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. करुणा शर्मा यांनी देखील हा पक्ष स्थापन केलेला आहे. गेले काही दिवस पक्षातर्फे कोण उमेदवार असणार आहे. यावर मंथन झाले आणि अखेरीस करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी स्वतःच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष स्थापनेनंतर थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये उतरल्याने करुणा शर्मा यांची आणि त्यांच्या पक्षाची चर्चा होत आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून सत्यजित (नाना) कदम यांचे नाव जवळपास निश्चित होत आहे. मागील १० वर्षापासून नाना कदम हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत.

२०१४ सत्यजित (नाना) कदम यांनी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. सत्यजित (नाना) कदम हे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नातेवाईक आहेत. सुरुवातीच्या काळात ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले होते. मात्र, सगळेच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. २ टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार झाले होते. मात्र, आमदार मिळाल्यानंतर अवघ्या २ वर्षामध्येच त्यांचे निधन झाल्याने कोल्हापूर उत्तर मतदारसंघात परत एकदा निवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT