Kartiki Ekadashi 2023 Saam tv
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi 2023: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, नाशिकमधील दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी

Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज गुरुवारी पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक संपन्न झाली.

भरत नागणे

Kartiki Ekadashi 2023:

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज गुरुवारी पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्निक संपन्न झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला गावच्या बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या वारकरी दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत शासकीय महापूजेचा मान मिळाला. (Latest Marathi News)

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागातून सुमारे चार ते पाच लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. पंढरी नगरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.चंद्रभागा स्नानासाठी चंद्रभागेचा तीर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. दरम्यान यंदा राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आणि विविध समाजांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे काही प्रमाणात भाविकांची संख्या घटली आहे.

शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर मानाच्या वारकऱ्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षभर एसटीचा मोफत पास देऊन सन्मान केला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महापूजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल मंदिराच्या संवर्धन व सुशोभीकरण कामाचे‌ भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पहिल्या टप्प्यातील कामासाठी 26 कोटी 44 लाख रुपयांचा धनादेश मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आला.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांची गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत बारी गेली आहे. मुखदर्शनासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

संत नामदेव पायरी, महाद्वार येथे भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांच्या वतीने सुमारे सहा टन देशी-विदेशी फुलांनी मंदिर सजवले आहे.

दरम्यान, मराठा आणि धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. महापूजेच्यावेळी मंदिर परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते. मंदिराकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले होते. त्यामुळे भाविकांना याचा त्रास सहन करावा लागला.

टाळ मृदुंगाच्या गजराने अवघी पंढरी नगरी दुमदुमली

आज गुरुवारी पहाटे पासूनच भाविकांनी विठू नामाचा जयघोष करत विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केली आहे. विठू नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. मठ,मंदिरे, धर्मशाळा आदी ठिकाणी विठू नामाचा गजर सुरू आहे. अवघी पंढरी नगरी विठू माऊलीच्या भक्तीरसात नाहून निघाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT