Court News Saam TV
महाराष्ट्र

Court News: पतीला काळं म्हणणं पडलं महागात; कर्नाटकातील उच्च न्यायालयात घटस्फोटाची याचिका मंजूर

पती त्याच्या रंगावरुन काळं म्हणणे हे क्रूरतेशी समान असल्याचं म्हणत, न्यायालयाने घटस्फोटाची ही याचिका मंजूर केली आहे.

Ruchika Jadhav

Karnataka High Court: कर्नाटकातील उच्च न्यायालायने घटस्फोटाच्या एका प्रकरणात विशेष निकाल दिला आहे. एका जोडप्यात होत असलेल्या भांडणात पत्नी पतीला त्याच्या रंगावरुन बोलत होती. पतीला त्याच्या रंगावरुन काळं म्हणणे हे क्रूरतेशी समान असल्याचं म्हणत, न्यायालयाने घटस्फोटाची याचिका मंजूर केली आहे. (Latest Marathi News)

अधिक माहिती अशी की, एक ४४ वर्षीय पती आणि ४१ वर्षीय पत्नी दोघांमध्ये सातत्याने मतभेद होत होते. पत्नी आपल्या पतीला सतत त्याच्या रंगवरुन बोलायाची. त्याचा अपमान करायची. पतीच्या रंगामुळे पत्नी विनाकारण पतीपासून दूर गेली.

पत्नीच्या अशा त्रासाने पती देखील वैतागला होता. त्याने सुरुवातीला पत्नीला समजावून सांगितले मात्र पतीच्या रंगामुळे पत्नी त्याच्यापासून दूर जाऊन त्याच्यावर अवैध संबंधांचा आरोप करत होती. शेवटी पतीने तिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.

कर्नाटक उच्च न्यायालयाची टिप्पणी

कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी म्हटलं आहे की, "आम्ही दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पत्नी सातत्याने आपल्या पतीला अपमानीत करत असल्याचं समजलं. असं करुनही पत्नीने पतीवर खोटे आरोप केले, न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांच्या खंडपीठाने घटस्फोटासाठी पतीची याचिका स्वीकारताना असं म्हटलं आहे.

२०२२ मध्ये घटस्फोटासाठी केला होता अर्ज

पतीने साल २०१२ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. याचिकेत त्याने दावा केला होता की, पत्नी त्याच्या त्वचेच्या रंगाच्या आधारे आपला अपमान करत आहे. हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३ (I) (ए) अंतर्गत विवाह विघटन करण्याची याचिका फेटाळून लावणाऱ्या बेंगळुरू येथील कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला पतीने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर घटस्फोटाच्या पतिच्या याचिकेला मंजूरी मिळालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या निफाड तालुक्यातील गावांना पावसाचा फटका

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT