Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident : कर्नाटकमध्ये भीषण अपघात, सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Sangli News : सांगलीमध्ये भीषण अपघात घडला आहे. बेंगलोरो राष्ट्रीय महामार्ग अपघात झाला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय. मृत सांगलीच्या जत तालुक्यातील गावावर शोककळा पसरली.

Namdeo Kumbhar

karnataka accident sangli News : ख्रिसमसच्या सुट्टीसाठी गावाकडे जाताना सांगलीच्या कुटंबाचा भीषण अपघात झाला घडला आहे. कंटेनर ट्रक कारवर पलटी झाली, या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झालाय. या घटनेने जतमधील गावावर शोककळा पसरली आहे. नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ हा दुर्देवी अपघात झाला.

सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावतील लोक बेंगलोरवरून आपल्या गावाला येत असताना भीषण अपघात झाला. ख्रिसमस सुट्टी असल्यामुळे कारने सहा जण जतमधील आपल्या गावाकडे येत होते. त्यावेळी काळाने घाला घातला. कंटेनर ट्रक कारवर पलटी झाली. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

बंगलोर जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. ख्रिसमस निमित्त सुट्टी असल्याने हे कुटुंब आपल्या गावाकडे येत होते. त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. पोलिसांनी तीन क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने हटवली.

मृतामध्ये पती चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (16), मुली दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) यांचे निधन झाले आहे. चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते. तर नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांना मोठा मनस्ताप|VIDEO

Samsung Diwali Sale: सॅमसंगची धासू ऑफर, Galaxy S24 FE दिवाळीच्या सेलमध्ये अर्ध्या किमतीत

Maharashtra Live News Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

सकाळचा एक कप चहा पाहा तुमचं किती नुकसान करतोय

Narak Chaturdashi: नरक चतुर्दशीला कोणत्या देवाचे पूजन करतात? आणि किती दिवे लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT