कर्जत पोलिसांनी आरोपीकडून रक्कम केली वसूल. 
महाराष्ट्र

टायरविक्रीत गंडवणाऱ्या आरोपीकडून ४ लाख केले वसूल

सचिन आगरवाल

अहमदनगर ः टायर खरेदी व्यवहारात फसवणूक झालेल्या दुकानदाराला पोलिसांनी न्याय मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे तातडीने त्याची रक्कमही मिळवून दिल्याने कर्जत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

धनंजय लक्ष्‍मण दळवी (वय 35 वर्ष, धंदा टायर दुकान, राहणार भांडेवाडी, तालुका कर्जत) यांनी फिर्याद दिली होती. त्यांचे साई टायर्स नावाचे दुकान आहे. त्याला दुकानात विक्री करण्यासाठी यातील आरोपी गणेश कांताराव पिंगळकर (राहणार ताले हॉल गल्ली, हिंगोली, तालुका जिल्हा हिंगोली) याने त्याचा मोबाईल क्रमांक 7888140243 वरून फिर्यादीचे मोबाईलवर कॉल केला. मी अधिकृत टायर विक्रेता असल्याचे त्याने सांगितले. त्याचा जीएसटी नंबर व त्याच्या दुकानाचा नंबर पाठवला. त्याचे बँक अकाउंटमध्ये फिर्यादीने टायर खरेदीकरीता 12 लाख 87 हजार रुपये टाकून त्यापैकी सहा लाख चार हजार दोनशे रुपयेचे टायर आरोपीने फिर्यादीस बिल न देता पाठवून दिले.

उर्वरित रकमेचे टायर्स पाठवले नाहीत. फिर्यादीने आरोपीस पाठवलेल्या जीएसटी नंबरची खात्री केली असता सदर जीएसटी नंबर वैभव मारुती भोसले याचा असल्याचे समजले. आरोपीने त्याचे आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीची अधिकृत विक्रेता असल्याची माहिती देऊन फिर्यादीकडून रक्कम घेऊन फिर्यादीस विना बिलाचे टायर पाठवून दिले. तसेच फिर्यादी दळवी यांना उर्वरित रक्कम न देता सदरचा अपहार केल्याचा गुन्हा नोंद केला.

यातील आरोपी गणेश कांतराव पिंगळकर (वय 30 वर्ष) यास १ जुलै रोजी हिंगोली येथून अटक केली. त्याच्याकडून चार लाख रुपये जप्त करण्यात आले. तसेच त्याचा जोडीदार आरोपी अमित सुभाष जाधव (राहणार कोथरूड, पुणे) यास दिनांक १२ रोजी पुणे येथून अटक केली. आज रोजी फिर्यादीला सदरची रक्कम सुपूर्द करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, सचिन वारे यांनी केली.

Edited By - Ashok Nimbalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT