Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार की राम शिंदे जिंकणार? कार्यकर्त्यांमध्ये लागली १ लाखाची पैंज

निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदार संघात २०२४ साली कोण निवडून येणार, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ahmednagar News: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही २०२४ साली होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होण्याआधीच कार्यकर्त्यांना या निवडणुकीचे वेध लागले आहे. या निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदार संघात २०२४ साली कोण निवडून येणार, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. या प्रश्नावरून दोन कार्यकर्त्यांमध्ये थेट एक लाख रुपयांची पैंज लागली आहे. (Latest Marathi News)

कर्जत-जामखेड मतदार संघात २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवार की राम शिंदे जिंकणार, हा प्रश्न मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सतावत आहे. या प्रश्नावरून थेट कार्यकर्त्यांनी १ लाखांची पैंज लावलं आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातील या पैंजेची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये लागली एक लाखांची पैंज

अहमदनगरच्या कर्जत-जामखेड मतदार संघात २०२४ साली कोण निवडून येणार, आमदार रोहित पवार की आमदार राम शिंदे, यावरून पैंज कार्यकत्यामध्ये लागली आहे. रोहित पवार यांचे समर्थक विशाल डोळे आणि रामद शिंदे यांचे समर्थक जायभाय यांच्यात पैंज लागली आहे.

या पैंजेसाठी या दोघांनी विष्णू जायभाय या मध्यस्थीकडे चेक जमा केलं आहे. निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना कार्यकर्त्यांचा आत्ताच उत्साह शिगेला पोचला आहे. जिल्हयात या १ लाख रुपयांची पैंजेची जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे आमदार आहेत. ते राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तर राम शिंदे हे भाजपचे नेते असून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचा २०२९ मध्ये रोहित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकार नेहमी राजकीय खेळ करते - प्रियंका गांधी

आम्ही चर्चेसाठी तयार...; विरोधक धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत मोठा गोंधळ|VIDEO

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

Blood Pressure : बीट की डाळिंब? BP नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता ज्यूस फायदेशीर

SCROLL FOR NEXT