Supriya Sule : छत्रपती संभाजी महाराजांवरील वादावर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'धर्म,जात...'

भाजपच्या आंदोलनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
supriya sule
supriya sulesaam tv

प्राची कुलकर्णी

Supriya Sule News : राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, अजित पवार यांनी विधीमंडळात छत्रपती संभाजी महाराजांवर वक्तव्य केल्याने भाजपने त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने राज्यभर अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. भाजपच्या आंदोलनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'धर्म,जात यावर चर्चा केली पाहिजे. 'महागाई आणि बेरोजगारी हे प्रश्न असताना भाजप त्यावर आंदोलन करत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

supriya sule
महापालिकांसाठी वंचित-शिवसेनेचं ठरलं; महाविकास आघाडीचं काय? प्रकाश आंबेडकर यांनी सर्वकाही सांगितलं...

अजित पवार यांच्या 'छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवरी नव्हते, तर स्वराज्यरक्षक होते' या विधानाने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपने या वक्तव्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरु केले आहे.

भाजपच्या आंदोलनावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, धर्म, जात यावर चर्चा केली पाहिजे. पण महागाई आणि बेरोजगारी या वरची प्रश्न प्रलंबित असताना भाजप अजित पवार यांच्या विधानावर आंदोलन करत आहेत. स्वत:चं अपयश झाकण्यासाठी विरोधकांवर असे आरोप करण्यात येत आहे. अजित पवार यांचं वक्तव्य विरोधकांनी नीट ऐकावे, त्यांनी कोणाचाही अपमान केलेला नाही. भाजपने महागाई आणि बेरोजगारी यावर आंदोलन केले तर बरं वाटलं असतं'.

supriya sule
Sanjay Raut: शिंदे गट म्हणजे टोळी, अशा टोळ्या गँगवॉर किंवा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारल्या जातात; संजय राऊतांची टीका

'पेट्रोल-डिझेलची भाव वाढ झाली आहे. आमची सरकारला सहकार्य करायची इच्छा आहे. आम्ही राजकारण बाजूला ठेवून बोलायला तयार आहोत. आम्ही बेरोजगारी आणि महागाई वर चर्चा करू, अशा सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या.

दरम्यान, दुसरीकडे उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात जोरदार वाद पेटला आहे. याच उर्फी जावेद प्रकरणावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,' महिलांबद्दल मी बोलत नाही. आजही चिंता बेरोजगारीबद्दल आहे. हा मुद्दा सातत्याने मांडतो आहे. मुख्य विषयाला बगल द्यायला हे मांडलं जातं आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com