Prakash Ambedkar: शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे येत्या काळात प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत दिसेल असे अंदाज बांधले जात होते. मात्र प्रकाश आंबेडकरांना सांगितलं की, आजवर जी बोलणी झाली ती शिवसेना आणि आमच्यातच झाली आहे. (Latest Marathi News)
शिवसेनेसोबतच्या झालेल्या चर्चेत आमचं असं ठरलं आहे की आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र निवडणूक लढवायची. पुढच्या निवडणुकांमध्ये एकत्र जायचं असं आमच्यात बोलणं झालं आहे.
शिवसेनेचा असा प्रयत्न आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही बरोबर घेतलं पाहिजे. याला आमचा विरोध नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्र्वादीचा याला विरोध आहे, तर काँग्रेसचाही छुपा विरोध आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
गरीब मराठा सत्तेत यावा याला त्यांचा विरोध आहे. राष्ट्र्वादीला गरीब मराठा वरचढ होईल, असं वाटतंय म्हणून त्यांचा विरोध आहे. मात्र आमचा आणि शिवसेनेचा निर्णय झालाय फक्त आम्हाला जाहीर करायचा आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.
महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनाने निर्णय घ्यावा. काँग्रेस त्यांच्यासोबत येते का? आणि पुण्यामध्ये एनसीपी शिवसेनाला सोबत घेते का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. मुंबईमध्ये चर्चेआधी आम्ही 83 जागांवर तयारी केली होती, अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.