Karanja-Mangrulpir Highway Accident Indian Army Jawan Yogesh Aadole Death in Dhotra Village  saam tv
महाराष्ट्र

Washim Accident News: कारंजा-मंगरुळपीर महामार्गावर भयानक अपघात; सुट्टीवर आलेल्या जवानाचा जागीच मृत्यू

Karanja-Mangrulpir Highway Accident: कारंजा-मंगरुळपीर महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने योगेश यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

साम टिव्ही ब्युरो

मनोज जायस्वाल, साम टीव्ही

Karanja-Mangrulpir Highway Accident: महिन्याभराची सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वी गावी आलेल्या एका जवानाचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१७ जून) रात्री ९ वाजेच्या सुमारास वाशिमच्या (Washim News) कारंजा-मंगरुळपीर महामार्गावर घडली. सुनील आडोळे (वय २४ वर्ष) असे मृत जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

योगेश आडोळे हे मूळ धोत्रा गावातील रहिवाशी असून २०१९ साली भारतीय सैन्यदलात (Indian Army) दाखल झाले होते. मागील चार वर्षांपासून ते जम्मू काश्मीर मधील राजुरी येथे सेवा देत होते. महिन्याभराची सुट्टी घेऊन योगेश दोन दिवसांपूर्वीच गावी परत आले होते.

शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास नातेवाईकाच्या लग्नसमारंभावरून परतत असताना कारंजा-मंगरुळपीर महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या ट्रकने योगेश यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण (Accident News) होती, की योगेश यांचा जागीच मृत्यू झाला.

योगेश हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. योगेशच्या घरची परिस्थिती जेमतेमच असून त्यांचे घर त्यांच्या पगारावरच घर चालत होते. त्यांच्या पश्चात घरी आई एकटीच राहते. तर लहान बहिणीचे लग्न झाले आहे. योगेश यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या परिवारासह संपूर्ण गावावर मोठी शोककळा पसरली आहे.

दरम्यान, योगेश यांच्या निधनाची वार्ता सैन्यदलाला कळवण्यात आली. यानंतर पूलगाव येथील सैन्याचे अधिकारी गावात दाखल झाले. शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर धोत्रा ह्या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT