Hasan Mushrif Saamtv
महाराष्ट्र

Hasan Mushrif : सीमाभागात तणाव! कर्नाटक पोलिसांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर उगारली काठी

हिवाळी अधिवेशन सुरू झाले असतानाच कर्नाटक- महाराष्ट्र सीमावाद चांगलाच तापला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hasan Mushrif: राज्याचे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असतानाच कर्नाटक- महाराष्ट्र सीमावाद चांगलाच तापला आहे. अधिवेशनात कर्नाटक सीमावादावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी सुरू असतानाच महाविकास आघाडीचे नेते बेळगावमध्ये मोर्चा आयोजित केला आहे.

या मोर्चासाठी निघालेले राष्ट्रवादीचे (NCP) आमदार हसन मुश्रीफ यांच्यासहसोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला ज्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बेळगावमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घालण्यात आली होती. तरीही या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते रवाना झाले होते. मात्र या नेत्यांना दुधगंगा नदीवर रोखले.

यावेळी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणेंसह कार्यकर्त्यांना लाठीचार्ज करत पाठीमागे नेले. यावेळी सहन मुश्रीफ यांच्यावर काठीही उगारण्यात आली. ज्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संपूर्ण वादामध्ये महाराष्ट्र पोलिसांनी हस्तक्षेप करत हसन मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्त्यांंना पोलिस व्हॅनमध्ये बसवले. नंतर काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले. या बद्दल हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारचा निषेध केला.

माझ्यावर कर्नाटक पोलिसांनी लाठी प्रहार केला. याचा मी निषेध करतो. या पुढेही मराठी भाषिकांसाठी आमचे आंदोलन सुरूच राहिल. बिदर -भालकी बेळगाव कारावार सह संयुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष

Raksha Bandhan 2025: शास्त्रानुसार राखी कोणत्या हाताला बांधावी?

HBD Kiara Advani : सुंदर दिसण्यासाठी कियारा अडवाणी लावते 'हा' फेसपॅक, फक्त ५ रूपयांत घरीच होतो तयार

Bank Loan Recovery : 'आधी पैसे दे, नंतर बायकोला घेऊन जा', कर्जाचे पैसे न दिल्याने बँकेने महिलेला नेलं उचलून

Murud-Janjira To Vasai Fort: मुरुड जंजिरा किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत जायचंय? वाचा सर्वोत्तम वाहतुकीचे पर्याय

SCROLL FOR NEXT