ratnagiri , lanja , dog squad, crime news
ratnagiri , lanja , dog squad, crime news saam tv
महाराष्ट्र

Kankavali : रात्रीस खेळ चाले; कणकवलीत दहा फ्लॅट फाेडले, रहिवाशांवर हल्ला

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Kankavali Crime News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली (kankavali) शहरात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे. एकाच इमारतीमधील दहा फ्लॅट फोडून चोरी झाल्याची घटना समाेर आली आहे. या चाेरीमुळं परिसरात भितीचे वातावरण पसरलं आहे. (Sindhudurg Latest Marathi News)

कणकवली शहारातील मराठा मंडळ रस्त्यावर क्रिस्टल रेसीडेन्सी या इमारतीत मध्यत्रीच्या सुमारास चाेरांना शिरकाव केला. कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. काही रहिवासी जागे झाले. त्यांनी त्यांच्या घरातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. परंतु चाेरट्यांनी फ्लॅटना बाहेरून कडी घातली हाेती.

यावेळी चाेरट्यांनी दरवाजा तोडताना आवाज आल्याने काही नागरीकांनी आरडाओरड केली. त्यानंतर चाेरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना काही लाेकांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी कटावणीने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

या चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांवर विटा देखील भिरकावल्या. दरम्यान चोरी करताना एकूण तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. सध्या घटनास्थळी कणकवली पोलीस श्वान पथकाच्या साह्याने घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT