Marathi auto driver assaulted in Kandivali over language dispute saam tv
महाराष्ट्र

मराठी रिक्षाचालकाला परप्रांतियाची मारहाण, मराठी विरोधात माजोरड्या भैय्यांचा मुंबईत संप

Auto Drivers Call Strike Over Marathi Rule: परप्रांतीय रिक्षाचालकांची मुजोरी आता दिवसेंदिवस वाढत चाललीय....कांदिवलीत एका मराठी रिक्षाचालकाला भैय्य़ा रिक्षाचालकानं मारहाण केलीय...एवढंच नव्हे तर मराठीविरोधात माजोरड्या भैय्यांनी थेट संपच पुकारलाय? पाहूयात या रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

मराठी माणसांनी प्राणाची आहुती देऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवला. पण आता मराठी मुलुखातच मराठीविरोधात याच भैय्यांची.. होय, अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची दादागिरी वाढलीय..

पोटापाण्यासाठी, कामाधंद्यासाठी घराबाहेर पडलेल्या या मराठी माणसाला रस्त्यावर घोळक्यान जमलेल्या माजुरड्या रिक्षाचालकांनी रिक्षा थांबवून बाहेर काढून कसं हुसकावून लावलं.. मराठीसक्ती विरोधात रास्तारोको करणाऱ्या या भैय्यांची तोंड जरा नीट पाहा, हे तेच मराठी द्वेष्टे , महाराष्ट्र द्रोही आहेत ज्यांना महाराष्ट्रात आपल्या मुंबईत मराठी भाषा नकोय. म्हणून त्यांनी मुंबईसह राज्यभरात मराठी भाषा सक्तीविरोधात संपाची हाक दिलीय... पुढील 3 दिवस रिक्षाचालकांनी बंद पुकारलाय...

मुंबईत पोट भरणाऱ्या या भैय्यांची ही मुजोरी पाहीली. या भैय्यांनी केवळ संपाची घोषणा करुन केवळ प्रवाशांची नाकाबंदी केलेली नाही तर त्यांनी या भैय्यांच्या बंदला पाठींबा न देणाऱ्या एका मराठी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. या भैय्यांची ही मुजोरी इतकी वाढली की त्यांना कायद्याची देखिल आता भीती नाही. मराठी रिक्षाचालकांना मारल्याच्या घटना समोर आल्यानंतर मग मराठी सक्तीच्या समर्थनात भूमिका घेणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन या भैय्यांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला.

मुंबईच्या पुर्व उपनगरात या आधी देखिल मराठीला नाकारण्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यात कांदिवलीमध्ये आता रिक्षाचालकांची ही मुजोरी समोर आल्यानंतर मराठी भाषेचा या भैय्यांना किती द्वेष आहे हे पुन्हा एकदा दिसलंय. या संपकरी मुजोर भैय्यांवर आरटीओ आणि पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केलीये. मात्र यानिमित्तानं काही गंभीर प्रश्न समोर आले आहेत.

महाराष्ट्रातच मराठीला विरोध करण्याची हिंमत येते कुठून?

मराठीचालकांना घेरून मारण्याची हिंमत झालीच कशी?

मुंबईकरांना वेठीस धरण्याचा अधिकार भैय्यांना कोणी दिला?

गेल्या काही दिवसांपासून मराठी न बोलणाऱ्या चालकांवर परिवहन खात्यानं कारवाईचा धडाका सुरू केलाय. मात्र मराठीला विरोध करून संपाच्या माध्यमातून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांवरही परिवहन खातं कडक कारवाई करणार का? मराठी चालकांवर हल्ला करणाऱ्या या गुंड भैय्यांचा माज पोलीस तरी उतरवणार का? असे गंभीर प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDA ची राज्यभर धडक कारवाई; मुंबई क्रिकेट क्लबसह ११ ठिकाणाचे परवाने निलंबित

Maharashtra News Live Update: राजुरा न्यायालयासमोर गोळीबार; एक ठार, आरोपींची पोलिसांसमोर शरणागती

कुछ तो बडा होने वाला है ! राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी CM फडणवीस मैदानात

Peanut Mirchi Bhaji Recipe: नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा कुरकुरीत टेस्टी शेंगदाणा-मिरची भजी, वाचा सोपी रेसिपी

उपचाराला दिरंगाई? आई-बाळाचा मृत्यू; ग्रामीण रुग्णालयावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT