Kalyan Railway News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: पादचारी पुलावर पहाटे मारहाण करत लुटमार; कल्याण रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना, व्हिडिओ आला समोर

पादचारी पुलावर पहाटे प्रवाशांना मारहाण करत लुटमार; कल्याण रेल्वे स्थानकावरील धक्कादायक घटना, व्हिडिओ आला समोर

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात पादचारी पुलावर तीन प्रवाशांना मारहाण करून लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी (Kalyan News) कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटिव्हीच्या (CCTV) आधारे दोन जणांसह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यांचा एक साथीदार पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकाच्या नव्या पादचारी पुलावर सुखवीर सिंग हा प्रवासी झोपला होता. सुखवीर सिंग यांना सकाळी पुण्याला जायचे होते. रेल्‍वेची वाट पाहत ते पुलावर बसले असताना त्यांचा डोळा लागला. सुखविंदर झोपले असल्याचे पाहून चार तरुण त्यांच्याजवळ (Railway) आले. या चौघांनी सुखविंदर यांना लाथेने मारून उठवले. त्यानंतर धमकी देत त्यांच्याकडून मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतले.

दोन प्रवाशांनाही लुटले

यानंतर इतर दोन प्रवाशांना देखील त्यांनी मारहाण करत त्यांच्या जवळील मोबाईल आणि काही रोकड हिसकावल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सुखबीर सिंग यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार नोंदवली. इतर दोन प्रवासी अद्यापपर्यंत तक्रार करण्यास आलेले नाही. कल्याण आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत या आरोपींचा शोध सुरू केला. हे चौघे आरोपी निष्पन्न झाले. कल्याण जीआरपीच्या पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. दीपक मगर, कुणाल गोंधळे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून चौथा आरोपी साहिल काकड याचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nirmala Nawale: कारेगावच्या सरपंचबाईंनी केली पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा; PHOTO पाहा

Dharashiv : शेतात काम करताना अनर्थ घडला; तीन चिमुकल्या झाल्या पोरक्या, गावाने उचलली मुलींची जबाबदारी

Maharashtra Live News Update: उद्या दुपारी होणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Rajgira Paratha Recipe : श्रावणात उपवासाला करा झटपट राजगिऱ्याचे पराठे, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; ५७ बंधारे पाण्याखाली | VIDEO

SCROLL FOR NEXT