Kalyan Railway Crime Saam tv
महाराष्ट्र

Railway Crime: रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांच्या सामानाची चोरी; लुटणारे दोन चोरटे अटकेत

Kalyan News : रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांच्या सामानाची चोरी; लुटणारे दोन चोरटे अटकेत

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे सामान चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरटयांना (Kalyan) कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी (Police) अटक केली आहे. दिनेश निनावे आणि संतोष चौधरी अशी चोरट्यांची नावे आहेत. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. (Tajya Batmya)

कल्याण रेल्वे स्थानकावर मेल एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाची सोन्याचे दागिने असलेली बॅग हिसकावून चोरट्याने पळ काढला होता. याप्रकरणी कल्याण रेल्वे (Railway) क्राईम ब्रांच तपास करत होती. क्राईम ब्रांचचे पोलिस अधिकारी अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एक चोरटा सिसिटीव्हीमध्ये दिसून आला. पोलिसांनी या चोरट्याची ओळख पटवून दिनेश निनावे या चोरट्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशी दरम्यान त्याच्या साथीदाराची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचत त्याचा साथीदार संतोष चौधरी याला देखील बेड्या ठोकल्या. 

४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत 

दोघे सराईत चोरटे असून त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल करण्यात रेल्वे क्राईम ब्रँचला यश आले आहे. त्यांच्याकडुन सोन्याचे दागिने, पाच मोबाईल व टॅब असा जवळपास चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांग्लादेशात हिंदूंवरअत्याचार, मंदिरं जाळली, घरं तोडली, 1 कोटी 31 लाख हिंदूंचं अस्तित्व धोक्यात

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या बैठकीतली मोठी बातमी शरद पवारांच्या पक्षाकडून ६० ते ६५ जागांची मागणी

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार?

जगाची झोप उडवणारी एपस्टीन फाईल उघड, मुलींचे रेट ते बड्या नेत्यांच्या चॅटचा पर्दाफाश

New Year Tourism: लोणावळ्यापासून 20 किमीतील Hidden ठिकाणे, 31st ला करा मित्रांसोबत धमाल

SCROLL FOR NEXT