Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: तडीपार असलेल्‍या दोघांकडून चोरी; दुकानातून लांबविले ३३ मोबाईल

तडीपार असलेल्‍या दोघांकडून चोरी; दुकानातून लांबविले ३३ मोबाईल

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी, मारहाणीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्‍याने (Police) पोलिसांनी तडीपार केले होते. तरी देखील शहरातील मार्केट परिसरात येवून मोबाईल दुकानात चोरी (Theft) करण्याचे धाडस केले. या चोरीनंतर पोलिसांनी दोन्‍ही चोरट्यांना अटक केली आहे. (Live Marathi News)

डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोबाईलच्या दुकानात घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फिरोज उर्फ बटला खान, सागर पारखे असे दोन चोरट्यांची नाव आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे अडीच लाखांचे मोबाईल हस्तगत केले. दरम्यान सागर व फिरोज हे दोघे अट्टल गुन्हेगार असून या दोघांविरोधात मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरी, मारहाणीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सागर पारखे याच्यावर पोलिसांनी तडीपरीची कारवाई केली होती. तर फिरोज हा मुंबईतून पसार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर या दोघांनाही डोंबिवली (Dombivali) रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात

३३ मोबाईल चोरले

डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर मोबाईलचे दुकान आहे. १४ एप्रिलला मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यानी दुकानाचे शटर उचकटून सुमारे चार लाख रुपये किंमतीचे ३३ मोबाईल चोरून नेले होते. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. सीसीटीव्हीच्या आधारे दोन्ही चोरट्यांची ओळख पटवून पोलिसांनी दोघांना सापळा रचत बेड्या ठोकल्यात. सागर पारखे व फिरोज उर्फ बटला खान अशी या दोन चोरट्यांची नावे आहेत. या दोघांविरोधात मुंबईमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात त्‍यांनी मोबाईलच्या दुकानातून ३३ मोबाईल चोरले आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

SCROLL FOR NEXT