Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: किती हप्ता पाहिजे ते सांगा, आम्ही लोक वर्गणीतून देतो; पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे वक्तव्य

किती हप्ता पाहिजे ते सांगा, आम्ही लोक वर्गणीतून देतो; पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचे वक्तव्य

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : पोलीस नशेखोरावर कारवाई करत नाही. गांजाडी, नशेडी, गुन्हेगारांकडून हप्ते घेण्यासाठी वर्दी घातली आहे. सण उत्सवामध्ये (Kalyan) लाऊड स्पीकर लावला की पोलीस कारवाई करतात. आम्ही भरत असलेल्या टॅक्समधून तुम्हाला पगार मिळतो. तो पुरत नसेल तर किती हप्ता पाहिजे ते (Police) आम्हाला सांगा. आम्ही लोकवर्गणी काढून तुम्हाला देतो; असे आवाहन ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याने मोर्चा दरम्यान कोलशेवाडी पोलीस ठाण्यातच पोलिसांना केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. (Maharashtra News)

कल्याण पूर्वेत ११ वर्षाच्या मुलीचा हत्या झाल्याची घटना घडल्यानंतर नागरिकांकडुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भर रस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, कोयत्याने हल्ले, हाणामाऱ्या, हत्या अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचे वचक आहे की नाही असा सवाल उपस्थित झाला. नशेखर तरुणांकडून असे प्रकार घडत असल्याने कारवाई करण्याची मागणी सातत्याने केली जाते. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय.

अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या घटनेनंतर सोशल मीडियावर पोलिसांविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येते. काल नागरिकांतर्फे कोळशेवाडी पोलीस ठाण्यात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सडेतोड टीका केली. नीरज कुमार असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांना करण्यात आलेल्या या आव्हानाचा  व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection : 'थामा' की 'एक दीवाने की दीवानियत'; भाऊबीजेला कोणता शो हाऊसफुल? वाचा कलेक्शन

Crime: संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्याची हत्या, अनैतिक संबंधाच्या संशयावरून संपवलं; पिंपरी-चिंचवड हादरले

दिवाळी गिफ्टसाठी हट्ट, मालकाकडून शिवीगाळ करत अमानुष मारहाण, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Today's Panchang: आज कार्तिक शुक्ल तृतीया; अनुराधा नक्षत्राचा योग देणार शुभ फल, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

SCROLL FOR NEXT