Kalyan News
Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: पाच मिनिटांच्या झोपेत प्रवाशाची सोन्याची चैन आणि मोबाईल गायब

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख

कल्‍याण : लोकलची वाट पाहत फलाटावर बसलेल्या एका प्रवाशाला झोप आली. या संधीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाच्या गळ्यातून महागडी चैन आणि मोबाईल हिसकावून पसार झाला. (Kalyan) कल्याण जीआरपी पोलिस आणि आरपीएफ पथकाने या चोरट्याला सीसीटीव्हीच्या (CCTV) सहाय्याने बेड्या ठाेकल्या आहेत. सुनिल सोनावणे असे या चोरट्याचे नाव आहे. (Maharashtra News)

कल्याण नजीक असलेल्या शहाड रेल्वे स्थानकात (Railway) फलाटावर गिरीश पडवळ नामक व्यक्ती टिटवाळ्याला जाण्याकरीता रेल्वे गाडीच्या प्रतिक्षेत होते. फलाटावर बसले असताना त्यांना झोप लागली. झोपले असल्याचे पाहून एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि त्यांचा मोबाईल घेऊन पसार झाला. गिरीश पडवळ यांनी या घटेनची तक्रार कल्याण जीआपीमध्ये केली.

जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अभिजीत जगताप यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या चोरट्याच्या शोधाकरीता कल्याण आरपीएफ जवानांनी मोहिम सुरु केली. पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही लागला. त्यामध्ये एक व्यक्ती दिसून आला. पोलिसांनी पुढील तपास करत पाच तासात सुनिल सोनावणे या नावाच्या व्यक्‍तीला शोधून काढले. त्यानेच ही चोरीची घटना केल्याची कबूली पोलिसांना दिली.

अधिक खोलात चौकशी केली असता सुनील कैटरिंगचा काम करतो. उच्च शिक्षित असलेल्या सुनिल सोनावणे याच्याकडे पत्रकार असल्याचे ओळखपत्रही सापडले आहे. सुनिलने या आधी अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत का या अंगाने पोलिस तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये कसं जपाल जोडीदाराला? 'या' टीप्स करा फॉलो

Mangal Prabhat Lodha दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार?

Raveena Tandon : ४९ व्या वर्षीही रवीना टंडनच्या सौंदर्याची कमाल...

Astro Tips: पुजा करताना जांभई देऊ नका, आरोग्यावर होईल परिणाम

Mumbai News: मुंबईकरांची चिंता वाढली, पाणीकपातीची टांगती तलवार; ७ धरणांत फक्त एवढाच पाणीसाठा!

SCROLL FOR NEXT