Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना आग; कल्याण जोशीबाग परिसरातील घटना

Kalyan News : आज दुपारच्या सुमारास अचानक या ठिकाणी आग लागली. क्षणार्धात ही आग पसरल्याने सुमारे वीस ते पंचवीस दुचाकी गाड्या जळल्या असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी जप्त केलेली वाहने कल्याण जोशीबाग परिसरात मच्छी मार्केटच्या (Kalyan) मागील बाजूस ठेवण्यात आली होती. पोलिसांनी जप्त केलेल्या या वाहनांना आज दुपारच्या सुमारास अचानक (Fire) आग लागली. यात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Breaking Marathi News)

कल्याण जोशी बाग परिसरातील मच्छी मार्केटच्या मागील बाजूस पोलिसांनी (Police) जप्त केलेली दुचाकी वाहन ठेवली जात असतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने ठेवण्यात आलेली होती. मात्र आज दुपारच्या सुमारास अचानक या ठिकाणी आग लागली. क्षणार्धात ही आग पसरल्याने सुमारे वीस ते पंचवीस दुचाकी गाड्या जळल्या असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आग नेमकी कोणत्या कारणाने लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.   

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गाड्या ठेवलेल्या मोकळ्या मैदानातून मोठ्या प्रमाणात धूर निघाल्याने आग लागल्याचे लक्षात आले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. आगीची माहिती (Fire Brigade) अग्निशमन विभागाला देण्यात आली होती. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत २० ते २५ गाड्या जळून गेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT