Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : आई- वडिलांना अपेक्षा होती पोलिस बनायची; खुश करण्यासाठी केला अजब प्रताप

Kalyan News : आई- वडिलांना अपेक्षा होती पोलिस बनायची; खुश करण्यासाठी केला अजब प्रताप

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : पोलिसांचा गणवेश घालून पोलीस असल्याचे भासवणाऱ्या एका तरुणाला कल्याण रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या. (Kalyan) अभिषेक सानप असे या तरुणाचे नाव आहे. तो नाशिक येथील सिन्नरमधील राहणारा आहे. या मुलाच्या तपासात जी माहिती समोर आली ती ऐकून (Police) पोलिसांनी देखील डोक्यावर हात मारला. (Breaking Marathi News)

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले खाडे यांची वाशिंद रेल्वे स्थानकात ड्यूटी होती. ड्यूटी करीत असताना त्यांनी लोकलमध्ये एक गणवेशधारी पोलिस दिसून आला. फलाट क्रमांक दोनवर आलेल्या सीएसटी लाेकल गाडीमधल्या जनरल डब्यात हा उभा होता. खाडे यांना संशय आला त्यांनी या तरुणाची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या तरुणाला लोकलमधून उतरविण्यास सुरुवात केली. खाडे यांनी टिटवाळा रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसाशी संपर्क केला. टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस (Railway Police) आणि आरपीएफ महिला जवान टेके यांच्या मदतीने गण‌वेशधारी पोलिसाला गाडीतून उतरविले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलिस निरिक्षक अर्चना दुसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी जी. बी. राणे यांनी तपास सुरु केला. अभिषेक हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील खंबाळे येथील भोकनी गावचा राहणारा आहे. तो बारावी शिकलेला आहे. त्याच्या आई वडिलांची अभिषेकने पोलीस बनावे अशी इच्छा होती. त्याने आई वडिलांना एक वर्षापूर्वी सांगितले की, एसआरपीएफमध्ये नोकरी लागली आहे. त्यानंतर त्याने त्याचे दौंडमध्ये प्रशिक्षण सुरु आहे. त्यानंतर तो रेल्वेच्या महिला डब्यात पोलिसांचा गणवेश धारण करुन प्रवास करत होता. त्याच्या पोलिस असण्याविषयी रेल्वे पोलिसांनाच संशय आल्याने तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या नकली पोलिसाला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

SCROLL FOR NEXT