अभिजित देशमुख
कल्याण : मराठी पाट्यासंदर्भात कल्याण डोंबिवलीमधील मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत (Kalyan) कल्याणमधील बहुतांश दुकानांवर अद्याप मराठी पाट्या (MNS) नसल्याचे निदर्शनास आणून देत कारवाई कधी करणार असा सवाल विचारला. तसेच याबाबत २७ फेब्रुवारीचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. (Breaking Marathi News)
न्यायालयाच्या आदेशानंतरही कल्याण शहरात बहुतांश दुकानांवर इंग्रजी पाट्या झळकत आहेत. मराठी पाट्यांबाबतची कारवाई ही कामगार आयुक्त कार्यालयाकडे असल्याने महापालिका हतबलता दर्शवत आहे. तर कामगार कल्याण आयुक्त कार्यालयाकडे मनुष्यबळ कमी असल्याची सबब दिली जातेय. मराठी पाट्या संदर्भात मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. त्यानंतरही मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर कारवाई झाली नाही. मराठी पाट्या संदर्भात आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तर तोडफोड आंदोलन
मनसेचे माजी आमदार व शहर अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हाप्रमुख उल्हास भोईर, महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई यांच्या (Kalyan Dombivali) नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज महापालिका आणि कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. कल्याणमधील बहुतांश दुकानांवर अद्यापही मराठी पाट्या नसल्याचे निदर्शनास आणून देत कारवाई कधी करणार असा सवाल विचारला. मराठी भाषा दिन म्हणजेच २७ फेब्रुवारीपर्यंत कारवाई झाली नाही, तर तोडफोड करण्याची सुरुवात तुमच्या कार्यल्यापासून करू. त्यानंतर दुकाने फोडू असा इशारा यावेळी मनसेने कामगार आयुक्त कार्यलयातील अधिकाऱ्यांना दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.