अभिजित देशमुख
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे खड्डे दर्शन स्पर्धा भरवली आहे. तर दुसरीकडे केडीएमसी विरोधात सेल्फी विथ खड्डा असा उपक्रम देखील मनसे राबवत आहे.
कल्याण (Kalyan) डोंबिवली शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. महापालिकेकडून खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षातही काम संथ गतीने सुरू असल्याने या खड्ड्यांतून प्रवास करताना वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यात मनसेतर्फे (MNS) शहरातील चौका चौकात सेल्फी विथ खड्डा अशा आशयाचे उपहासात्मक बॅनर लावण्यात आले. तसेच मनसेने खड्डे दर्शन स्पर्धा आयोजित केली आहे.
बक्षीस जिंकण्याचे आवाहन
शहरात लावण्यात आलेल्या बॅनरच्या माध्यमातून (KDMC) आपल्या परिसरातील खड्ड्यांचे सेल्फी आम्हाला पाठवा व आकर्षक बक्षीस जिंका असे आवाहन मनसेच्या वतीने करून करण्यात आले आहे .त्या पाठोपाठ मोठ्या प्रमाणात खड्डे उपलब्ध करून दिल्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आभार देखील मानण्यात आले आहेत. यामुळे आता केडीएमसी रस्त्यावरील पडलेले खड्डे कधी बुजविणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.