बुलढाणा : सिंदखेडराजा येथील बस स्थानकमध्ये हजारो विद्यार्थी- विद्यार्थिनी व प्रवासी यांना बससाठी तात्कळत बसावे लागते. इतकेच नाही तर एक देखील बस वेळेवर नसते. त्यामुळे विद्यार्थ्यी व प्रवाश्याचे हाल होत असतात. वेळेवर बस सोडा, तसेच सिंदखेडराजा येथून बस सोडण्यात याव्यात या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मागील अनेक दिवसापासून (Buldhana News) प्रवाशी व विद्यार्थ्यांना बसची वाट पाहावी लागत आहे. सर्व बस बाहेरील तालुक्यातून येत आहेत. स्थानिक सिंदखेडराजा (Sindkhedraja) येथून एकही बस सुटत नाही. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्रवाशांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. शाळा व महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना नाईलाजास्तव खाजगी गाड्याने प्रवास करावा लागतो. यामध्ये बराच वेळा विद्यार्थिनीना नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
सिंदखेडराजा येथील बस स्थानकावरून एकही बस जात नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या या समस्येवर एसटी महामंडळाने लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी (BJP) भाजपचे शहराध्यक्ष संदीप मेहेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना व प्रवाशांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.