Kalyan MNS Saam tv
महाराष्ट्र

Kalyan MNS : वाढीव कचरा शुल्क प्रकरणी मनसे आक्रमक; केडीएमसी मुख्यालयावर जन आक्रोश मोर्चा

Kalyan News : कल्याण- डोंबिवली महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी केलेल्या उपाय योजनानंतर आता नागरिकांवर वाढीव घन कचरा संकलन शुल्क लादले आहे. या वाढीव शुल्काला राजकीय पक्षांनी विरोध केला आहे

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: केडीएमसी कडून आकारण्यात येणाऱ्या कचरा शुल्काला मनसेने तीव्र विरोध करत आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट घेत कचरा वाढीव शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. 

कल्याण- डोंबिवली महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी केलेल्या उपाय योजनानंतर आता नागरिकांवर वाढीव घन कचरा संकलन शुल्क लादले आहे. या वाढीव शुल्काला राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. दरम्यान मनसेने देखील या वाढीव शुल्क विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अनुषंगाने आज मनसेने हजारो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक दिली. 

वाढीव शुल्क विरोधात घोषणाबाजी 

मोर्चात कल्याण डोंबिवली महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वाढीव कचरा शुल्क रद्द करण्यात यावा; अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेने आकारलेला वाढीव कचरा शुल्क रद्द करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला त्याला पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. 

केडीएमसीला दिला इशारा 

केडीएमसी कोणत्या तरी ठेकेदाराच्या घशात पैसे टाकण्यासाठी कल्याणकरांच्या घराघरातून पैसे काढणार असेल, तर त्याला आमचा विरोधच आहे. आज आम्ही शांततेत मोर्चा काढला, मात्र अशा प्रकारची शांततेची अपेक्षा बाळगू नका. तुम्ही लोकांना फसवणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही. आमची भूमिका शांततेची नसेल असा इशारा अविनाश जाधव यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs SA: भारतीय कसोटी संघाची घोषणा, दुसरं मोठं संकट परतवून लावणाऱ्या धाकड क्रिकेटपटूची एन्ट्री, दोघांना बाहेरचा रस्ता

Vasai-Virar Tourism : स्वच्छ वाळू अन् हिरवेगार वातावरण, 'हा' आहे वसईजवळील शांत समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Solapur Reelstar Couple: प्रत्येक नवरा-बायकोनं बघावी अशी लव्ह स्टोरी! सोलापूरच्या कपलची संघर्ष कहाणी साऊथमध्ये झळकणार, VIDEO बघून डोळ्यात येईल पाणी

Maharashtra Politics : भाजपमध्ये अल्पसंख्याक सेल का? व्होट जिहादच्या आरोपावर मनसेचा खोचक सवाल

SCROLL FOR NEXT