Kalyan MNS Saam tv
महाराष्ट्र

Kalyan MNS : बँकेत मराठी भाषेच्या वापराबाबत मनसे आक्रमक; कल्याणमध्ये बँकांना पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

Kalyan News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठीचा मुद्दा मांडत बँका तसेच आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो कि नाही हे पाहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. यानंतर मनसे आक्रमक झाली

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर व्हायला हवा; याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेतली आहे. बँकांमध्ये जाऊन इंग्रजी फलक काढा, तसेच ग्राहकांशी देखील मराठीत संवाद साधावा; अशी मागणी केली जात आहे. त्यानुसार कल्याणमध्ये मनसेने आक्रमक होत बँकांना निवेदन देऊन पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठीचा मुद्दा मांडत बँका तसेच आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो कि नाही हे पाहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. या आदेशानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसे कल्याण शहर शाखेच्या वतीने आज कल्याण मधील बँकांना प्राधान्याने मराठीच्या वापराबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्याकडून बँकांना मनसे लिहिलेले पेपर वेट भेट देण्यात आले.

मराठी भाषेला प्राधान्य द्या 

मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी रिझर्व बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दैनंदिन कामकाजात मराठी भाषेला प्राधान्यक्रम द्या, बँकेतील कर्मचाऱ्यांनी देखील मराठी शिकून घ्या, आम्ही दिलेले पेपरवेटचे वजन इतर भाषांवर ठेवा आणि मराठीला प्राधान्य देण्यात यावे; याबाबतचे निवेदन बँकांना देण्यात आले आहे. 

तर पेपरवेट कुठे लागतील सांगता येत नाही 

बँकांना मराठी भाषेच्या वापराबाबत निवेदन देण्यासोबत पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अर्थात पंधरा दिवसात मराठी भाषा शिकावी तसेच येत्या पंधरा दिवसात बँकेतील व्यवहार मराठीत झाले नाहीत; तर दिलेले पेपरवेट कुठे कुठे लागतील याला आम्ही जबाबदार नसू, असा इशारा देखील मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. माजी आमदार प्रकाश भोईर, महिला कल्याण शहर अध्यक्ष कस्तुरी देसाई, जिल्हाध्यक्ष उर्मिला तांबे हे देखील यावेळी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT