Ravindra Chavan Saam tv
महाराष्ट्र

Ravindra Chavan News: आता टीआरपीचा खेळ बंद झालाय; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे शिवसेना शहर प्रमुखांना खडेबोल

आता टीआरपीचा खेळ बंद झालाय; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे शिवसेना शहर प्रमुखांना खडेबोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याणमधील शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी नाव न घेता शिवसेनेच्या शहर प्रमुखांना खडेबोल सुनावले आहेत. टीआरपी कसा वाढेल त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय. मात्र आता टीआरपीचा खेळ बंद झालाय. युतीबाबत सर्व निर्णय वरिष्ठ घेतील. (Shivsena) शिवसेनेला सहकार्य न करण्याबाबतच्या ठरावाबाबत निर्णय वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. (Live Marathi News)

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मोदी @9 या मोहिमेंतर्गत डोंबिवली शेलार नाका परिसरात घरोघरी जावून नागरिकांची भेट घेत सरकारची कामे सांगितली. यावेळी त्यांनी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या शिवसेना भाजप नेत्यांमधील कुरघोडीबाबत स्थानिक शिवसेना शहर प्रमुखाना सुनावले.

केंद्रात भाजपच्या (BJP) सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने जनसंपर्क अभियानांतर्गत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली शेलार नाका परिसरात घरोघरी जाऊन नऊ वर्षातील सरकारच्या कामांबद्दल जनजागृती केली. याच दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील सुरू असलेले शीत युद्ध तर डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघावर केलेला दावा. याबाबत रवींद्र चव्हाण यांना प्रश्न विचारले असता यावेळी कल्याण डोंबिवलित शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या कुरघोड्यावरून पत्रकारांशी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता टीआरपीचा खेळ बंद करा असा शब्दात शिवसेना शहरप्रमुखाना फटकारले.

रवींद्र चव्हाण यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात येत्या २०२४ मध्ये एनडीएचे सर्व उमेदवार जिंकुन आणणे, त्यानंतरच्या काळात शिवसेना भाजप युतीचे सर्व उमेदवार जिंकून आणणे ही आमची प्राथमिकता आहे. कल्याण लोकसभेत शिवसेनेला सहकार्य न करण्याच्या ठरवाबाबत बोलताना या ठरावाबाबत वरिष्ठ नेते त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तर शिवसेनेकडून कल्याण ग्रामीण विधानसभेवर दावा करण्यात आल्याबाबत प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चव्हाण यांनी शिवसेना भाजप युतीमधील सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतले जातात. यामुळे यानंतरच्या बाबतीत टीआरपीचा खेळ संपला असे मी घोषित करतो असे संगीतले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ताईला मानलं राव...भल्या मोठ्या नागाला पकडण्यासाठी केली कसरत; VIDEO पाहून मनात भरेल धडकी

US Presidential Election Result: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत १९८ मतं; कमला हॅरीस यांना किती मतं?

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

SCROLL FOR NEXT