Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र लांबविले; चोरटा अवघ्या चार तासात गजाआड

महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र लांबविले; चोरटा अवघ्या चार तासात गजाआड

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : लोकल ट्रेनमधून महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र खेचून पसार झालेल्या चोरट्याला कल्याण (Kalyan) रेल्वे पोलीसांनी अवघ्या चार तासात बेड्या ठोकल्या. प्रवीण पवार असे या चोरट्याचे नाव असून त्याने आणखी काही चोऱ्या केल्यात का? याचा तपास पोलीस (Police) करत आहेत. मात्र या घटनेनंतर महिला पोलिस जर पोलीस सुरक्षित नसतील तर इतर प्रवाशांच्या सुरक्षेचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Latest Marathi News)

कल्याण येथे राहणाऱ्या पूजा आंधळे या पोलीस कॉन्स्टेबल असून त्या मुंबई येथे कार्यरत आहेत. ३ मेस पुजा आंधळे या मुंबईला जाण्यासाठी लोकल पकडण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर आल्या. यावेळी पूजा या युनिफॉर्मवर नसून सिव्हील ड्रेसवर होत्या. लोकल आल्‍यानंतर त्यांनी लोकलमध्ये जात असताना एका चोरट्याने त्यांचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस (Railway Police) ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.

चार तासात चोरटा ताब्‍यात

याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ता चोरट्याचा शोध सुरू केला. अवघ्या चार तासात या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. प्रवीण पवार असे या चोरट्याचे नाव असून त्याला दारूचे व्यसन आहे. दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत चोरटे संधी साधत प्रवाशांचा ऐवज लंपास करतात. या घटनांवर आळा घालण्याचे आवाहन पोलीस यंत्रने समोर उभे ठाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

Shocking : धक्कादायक! ९ महिन्याचं बाळ धावत्या एक्सप्रेसच्या खिडकीतून पडले, नंतर जे घडलं त्याने काळजाचा ठोका चुकला

"मेंटेनन्स देणार नाही, काय करायचं ते करा" असं म्हणणाऱ्या फ्लॅटधारकांना झटका; सोसायटी करू शकते 'ही' कडक कायदेशीर कारवाई

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT