Nandurbar News: धडगाव तालुक्यात अंगणवाडी सेविकांच्या बोगस भरती; कुपोषणाला ठरतेय कारणीभूत

धडगाव तालुक्यात अंगणवाडी सेविकांच्या बोगस भरती; भरतीच्या निषेधार्थ उपोषण सुरू
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार ः कुपोषित बालमृत्यूला जबाबदार असलेले आणि बोगस अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers) भरती करणाऱ्यांवर (Nandurbar News) कायदेशीर कारवाई न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. दोन दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. (Maharashtra News)

Nandurbar News
Nandurbar Child Marriage: नंदूरबार पोलिस अधीक्षकांनी रोखला बालविवाह

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण (Malnutrition) आणि बालमृत्यू मोठ्या प्रमाणावर वाढत असून याला कारण धडगाव तालुक्यात २०१९ ते २०२२ पर्यंत अंगणवाडी सेविकांच्या बोगस भरती करण्यात आलेल्या आहे. तर इतर जिल्ह्यातील अधिकारी नंदुरबार जिल्ह्यातील काम करतात. मात्र वेळेवर उपस्थित राहत नसल्याने बालमृत्यू आणि माता मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत चालले आहे. यासाठी शासनाकडे वारंवार तक्रार करून देखील शासनाने दुर्लक्ष केले असल्यामुळे राष्ट्रीय अनुसूचि जमाती दक्षता परिषदेच्या वतीने धडगाव तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.

Nandurbar News
Jalgaon News: मुलाच्या नोकरीसाठी आईचे शोषण; अडीचा लाख रूपयांसह दागिनेही लुबाडले

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

ज्या अधिकाऱ्यांनी बोगस भरती प्रक्रिया राबवली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि ज्या अधिकाऱ्यांमुळे बालमृत्यू आणि माता मृत्यू झालेला आहे. त्यांच्यावर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावे; अशी मागणी करत आमरण उपोषणाला राष्ट्रीय अनुसूचि जमाती दक्षता परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचं या संघटनेने इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com