KDMC  Saam tv
महाराष्ट्र

KDMC : लाखो रुपयांची औषधी डम्पिंग ग्राउंडवर; केडीएमसी आरोग्य विभागाचा गलथान कारभार, प्रशासनाचे चौकशीचे आदेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली महापालिकेचे रुग्णालये नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. अशात केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून लाखो रुपयांची औषधी डंपिंग ग्राउंडवर टाकण्यात आल्याने गलथान कारभार समोर आला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: केडीएमसी आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. कल्याणच्या कचरा प्रकल्पात केडीएमसीची औषधे नष्ट करण्यासाठी आणण्यात आली. एकीकडे केडीएमसीची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असताना लाखो रुपयांचा औषधांचा साठा अशा प्रकारे नष्ट करण्यासाठी कचरा प्रकल्पात आढळल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी केडीएमसीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. कधी डॉक्टरांचा हलगर्जीपणा तर कधी रुग्णवाहिका चालकांची मनमानी अशा एक ना एक कारणांमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचे रुग्णालये नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. अशात केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून लाखो रुपयांची औषधी डंपिंग ग्राउंडवर टाकण्यात आल्याने गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. 

काही औषधी मुदतीत 

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेला लाखोंची औषध खरेदी करते. करदात्या नागरिकांचे लाखो रुपये खर्चून ही औषध महापालिका विकत घेत असते. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लाखो रुपयांच्या औषधांचा साठा कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे येथील कचरा प्रकल्पामध्ये आढळून आला. कचरा प्रकल्पामध्ये "Tab Fabiflu 200mg" आणि "Syp Ammoxclav Oral Suspension" या दोन औषधांचा साठा आढळला. यामध्ये "Tab Fabiflu 200mg"या गोळ्यांची मुदत संपलेली असली तरी "Syp Ammoxclav Oral Suspension" (एक्सपायरी डेट 08/2025) पर्यंत आहे.

अहवाल आल्यानंतर कारवाई 

दरम्यान Ammoxclav सिरपची मुदत अजून संपलेली नसताना गोरगरीब गरजू रुग्णांसाठी आलेली ही औषधे कचऱ्यात आली कशी? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. या घटनेमुळे केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला. याबाबत नागरिकांनी केडीएमसीला माहिती दिली असता महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवले. औषध कचरा प्रकल्पात कुठून आली? ती कोणी आणली? याची चौकशी सुरू असून या चौकशीचा अहवाल आल्यानंतर जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल; असं केडीएमसीच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT