Kalyan Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Kalyan Dombivali News : कल्याण डोंबिवलीमध्ये काम करणाऱ्या साडेआठशे कंत्राटी कामगारांना सामावून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी आज काम बंद आंदोलन पुकारले. आंदोलनाला ठाकरे गटाने देखील पाठिंबा

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: महानगरपालिकेने कचरा उचलण्याचा ठेका सुमित एल्कोप्लास्ट कंपनीला दिला आहे. या कंपनीने कामगारांना कामावर सामावून घ्यावे; यासाठी आज कंत्राटी सफाई कामगारांनी खंबाळपाडा कचरा डेपो येथे काम बंद आंदोलन केले होते. कामगारांच्या या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट देखील सहभागी झाला आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना कंपनीत सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कचरा उचलण्याचे कंत्राट आता सुमित कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या कंपनीत जवळपास कल्याण डोंबिवलीमध्ये काम करणाऱ्या साडेआठशे कंत्राटी कामगारांना सामावून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे या सफाई कंत्राटी कामगारांनी आज काम बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाला ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिला. जोपर्यंत निर्णय देत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला होता.

१५ ऑगस्टपर्यंत सामावून घेणार 

दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त तसेच सुमित कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. यावेळी केडीएमसी आणि सुमित कंपनी व्यवस्थापनाने या सफाई कामगारांना १५ ऑगस्टपर्यंत कामावर सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांचे थकीत पगार लवकरच देण्यात येईल; असे आश्वासन देखील दिले आहे. 

पैशांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट 

याच दरम्यान ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी काही जणांकडून या कंत्राटी कामगारांकडे सुमित कंपनीमध्ये सामावून घेण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याच्या काही ऑडिओ क्लिप असल्याचा देखील गौप्य स्फोट केला. तसेच इथून पुढे जर सफाई कामगारांकडे कुठल्या दलालाने पैशांची मागणी केली; तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: Pune: वारजे पुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

Pitra Dosh 2025: पितृ दोष असल्यास जीवनात 'हे' संकेत मिळतात

PUNE: बड्या नेत्याच्या बर्थडे पार्टीत भयंकर घडलं, मिरवणुकीदरम्यान DJ वाहनानं ६ जणांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू

Kidney failure warning signs: किडनी फेल झाल्यानंतर फक्त रात्रीच्या वेळी दिसतात 'हे' बदल; 90% लोकं करतात इग्नोर

SCROLL FOR NEXT