KDMC  Saam tv
महाराष्ट्र

KDMC : २७ गाव वगळून प्रभाग रचना करावी; केडीएमसीकडे काँग्रेस, उबाठा, मनसेची मागणी

Kalyan Dombivali News : प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना केडीएमसीत राहायचेच नाही निवडणूक आयोगाला केडीएमसी आयुक्तांनी सांगावे अशी मागणी संघर्ष समितीकडून करण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे 
कल्याण
: कल्याण- डोंबिवली महापालिकेकडून प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. यावर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली असून २७ गावांतून आलेल्या हरकतीनुसार हि गावे वगळून प्रभाग रचना तयार करण्यात यावी; अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून करण्यात आली आहे. 

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सुरु आहेत. त्यानुसार महापालिकांकडून प्रभाग रचना तयार केली जात असून नवीन प्रभाग रचनांवर हरकती मागविण्यात येत आहेत. त्यानुसार कल्याण- डोंबिवली महापालिकेकडून तयार केलेल्या प्रभाग रचना संदर्भात २६५ हरकती आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाने दिली होती. यावर सुनावणी देखील ठेवण्यात आली होती. या सुनावणी दरम्यान काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. 

त्या हरकतींची दखल न घेतल्याचा आरोप 

दरम्यान केडीएमसीच्या प्रभाग रचनेबाबत फक्त २७ गावातून ३ हजार ६४२ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेतली नव्हती; असा आरोप करीत कल्याण ग्रामीण २७ गाव सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समितीच्या नेतत्वात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सुनावणीस हजर राहून आयुक्तांसोबत चर्चा केली. 

२७ गावात निवडणूक न घेण्याची मागणी 

दरम्यान या चर्चेत समितीची एकच मागणी असून २७ गावे वगळून प्रभाग रचना तयार करण्यात यावी. २७ गावांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यामुळे २७ गावात निवडणूक घेण्यात येऊ नये; अशी मागणी करण्यात आली आहे. यावर चर्चा करताना केडीएमसीच्या आयुक्तांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला माहिती देणार असल्याचे आश्वासन समितीस दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : बंगल्यासाठी डान्सरकडून बीडच्या माजी उपसरपंचाचा घात? मृत्यूनंतर गर्लफ्रेंडचा Video समोर

Cake: गोडाची आवड ठरते घातक, केकचे दुष्परिणाम जाणून घ्या

Navi Mumbai Video : पोलीस अधिकाऱ्यानं रीलच्या नादात काय केलं बघा? VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात जोरदार पावसाला सुरुवात

Shrileela Saree Collection: श्रीलीलाच्या ट्रेंडी आणि क्लासिक साड्यांचे कलेक्शन पाहिलेत का? तुम्हीही करु शकता लूक कॉपी

SCROLL FOR NEXT