Kalyan Bajar Samiti  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Bajar Samiti : कल्याण कृउबाचा ५ ऑगस्टला कडकडीत बंद; सुविधा न पुरविल्यास बेमुदत बंद

Kalyan News कल्याण कृउबाचा ५ ऑगस्टला कडकडीत बंद; सुविधा न पुरविल्यास बेमुदत बंद

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र चिखल, घाण, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची दुरावस्था, (Kalyan) व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र प्रशासन व संचालक मंडळाने दुर्लक्ष केल्याचा आरोप एपीएमसी मार्केट (Bajar Samiti) मधील व्यापाऱ्यांनी केला. याकरिताच ५ ऑगस्टला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. (Tajya Batmya)

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यांची दुरावस्था, सर्वत्र पसरलेला कचरा, रस्त्यावर साचलेला चिखल त्यामुळे पसरलेली दुर्गंधी यामुळे शेतकरी, व्यापारी, माथाडी, हमाल व ग्राहक यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. बाजार आवारात मोठ्या प्रमाणात गाळ व शौचालायचे सांडपाणी रस्त्यावर आले असून परिणामी मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी, माथाडी, हमाल व ग्राहक यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर बाजार आवारातील घनकचरा व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाल्यामुळे या घाणीच्या साम्राज्यात आणखीनच भर पडली आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितील व्यापारी मार्केट शेअर्सच्या स्वरूपात बाजार समितीला कर भरत असून कल्याण डोंबिवली महापालिकेला मालमत्ता कर भरतात. मात्र बाजार समिती प्रशासनाकडून सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याने व्यापारी आक्रमक झाले. 

तर संचालक मंडळ बरखास्त करा 

भाजपचे (BJP) माजी आमदार नरेंद्र पवार यांनी एपीएमसी मार्केटची पाहणी केली. यावेळी व्यापारी, माथाडी कामगारांशी चर्चा केली. आमदार नरेंद्र पवार यांनी बाजार समिती प्रशासन व संचालक मंडळाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. व्यापाऱ्यांना सोयी सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्यांना संचालक मंडळ वेठीस धरतेय. मुस्लिम व्यापाऱ्यांना बांगलादेशी व्यापारी म्हणून  हिनवतंय हे अत्यंत निषेधार्थ आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत जरी शिवसेना भाजपची सत्ता असले तरी निवडून येणाऱ्या संचालक मंडळाला सोयी सुविधा देणे त्यांचे काम आहे. मात्र ते देऊ शकत नसतील तर हे संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी सहकार मंत्र्यांकडे करणार असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

WTC Points Table: गुवाहाटी टेस्टमधील पराभव टीम इंडियाला पडणार महागात, WTC पॉईंट्स टेबलमध्ये होणार घसरण, पाहा समीकरण

Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

Chanakya niti: दुपारच्या वेळेस का झोपू नये? चाणक्यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

SCROLL FOR NEXT