Kalyan Crime News SAAM TV
महाराष्ट्र

Kalyan Crime News : ८ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं, पत्नीसोबत पतीचे भयंकर कृत्य; मामामुळं धक्कादायक प्रकार उघड

Crime News In Marathi : आठ महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. तरुणीचा पती काहीच काम करत नव्हता. यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. याच रागातून पतीने तिला संपवण्याचा प्रयत्न केला.

Nandkumar Joshi

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Malang Raod Crime News :

कल्याणमधील मलंग रोड पिसवली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठ महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणीला तिच्या पतीनेच संपवण्याचा प्रयत्न केला. स्टूल उचलायला सांगितलं म्हणून निर्दयी पतीने तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केलं.

आठ महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. तरुणीचा पती काहीच काम करत नव्हता. यावरून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. याच रागातून पतीने तिला संपवण्याचा प्रयत्न केला. मानपाडा पोलिसांनी संशयित आरोपी पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याण पूर्व येथील मलंग रोड परिसरात एका सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर दोघे राहतात. आरोपी पती बेरोजगार आहे. दोघेही मूळचे जळगावचे रहिवासी आहेत. २२ ऑक्टोबरला दोघे पती-पत्नी गावी गेले होते. त्यावेळी मुलीच्या मानेवर व्रण दिसल्याने तिच्या मामाने यासंदर्भात विचारणा केली. तरुणीने हकिकत सांगितल्यानंतर मामाच्या पायाखालील जमीनच सरकली.

तरुणीच्या म्हणण्यानुसार, १६ ऑक्टोबरला संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास ती घरात काम करत होती. घरात साफसफाई करायची असून लोखंडी स्टूल उचलून गॅलरीत ठेवा, असं तिने पतीला सांगितले. एवढ्यावरून पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तू नेहमी मला काम सांगते. काही न काही बोलत राहते. तुझा आवाज आज बंदच करून टाकतो, असे तो रागाने म्हणाला. त्याने तिला गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. (Crime News)

तरुणीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर हादरलेल्या मामाने तिला सोबत घेऊन थेट जळगाव येथील पोलीस ठाणे गाठले. ज्या हद्दीत ही घटना घडली, तेथील पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला तेथील पोलिसांनी दिला. त्यानंतर ती आणि मामा मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले. तिच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी गणेश भुवड या प्रकरणाचा तपास करीत आहेत. संशयित आरोपी हा जळगावला पळून गेला आहे. त्याला अटक करण्यासाठी मानपाडा पोलिसांनी पथक नेमले आहे. लवकरात लवकर त्याला अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Bhendi Recipe : कुरकुरीत अन् झणझणीत भरली भेंडी, चव अशी की खातच राहाल

Maharashtra Live News Update : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परतीच्या पावसाचा धुडगूस

Raigad Shocking : रायगडमधील कोट्यवधींच्या अपहार प्रकरणात मोठा ट्विस्ट; मुख्य आरोपीने मेहुण्याच्या घरात आयुष्य संपवलं

Ladki Bahin Yojana: १२ हजार भावांनी मारला लाडकी बहिणींच्या पैशांवर डल्ला; योजनेत १६४ कोटींचा घोटाळा

Sonali Kulkarni: गुलाबी साडी अन् लाली...; सोनाली कुलकर्णीचा दिवाळी स्पेशल लुक, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT