Maratha Reservation: 'दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही'; व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत तरुणानं आयुष्य संपवलं

Maratha Reservation: घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
Maratha Reservation
Maratha ReservationSaam TV
Published On

Maratha Aarakshan:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या मोठ्या चर्चेत आहे. आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा हाती घेत राजकीय नेत्यांना गावबंदी केलीये. यासह मराठा युवक आरक्षणासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहेत. आजही एका मराठा युवकाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली आहे.

Maratha Reservation
Maratha Aarakshan Andolan : तब्बल तीन तासांपासून कळंब- ढोकी महामार्गाची वाहतूक खाेळंबली, मराठा आंदाेलकांनी रस्त्यावर पेटवले टायर

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव इथे राहणारा महेश बाबुराव कदम पाटील या तरुणाने "दुष्काळ जगू देत नाही.. आरक्षण शिकू देत नाही" असं स्टेटस मोबाईलवर ठेवलं आणि चिट्टी लिहीत काल विष प्राशन केलं होतं. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

आज एकाच दिवशी दोन आत्महत्येच्या घटना घडल्यात. मराठा समाजाला आरक्षण द्या, ही मागणी करत आणखी एका तरुणाने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केलीय. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथे ही घटना घडलीय. शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न रात्री पाण्याच्या टाकीवर चढला होता. तिथे त्याने दोन तास आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली होती.

त्यानंतर जरांगे पाटील यांच्याशी तरुणाचं बोलणं करून दिलं होतं. पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. नातेवाईक आणि मराठा क्रांती मोर्चाने शत्रुघ्नचा मृतदेह अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नेत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

Maratha Reservation
Panjab Crime News: शिक्षक झाला हैवान! विद्यार्थ्यांला कार बोनेटवर लटकवून केलं भयंकर कृत्य; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com