Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: प्रवाशाची बॅग, मोबाईल हिसकावून पळाला; आरपीएफ कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत पकडले

प्रवाशाची बॅग, मोबाईल हिसकावून पळाला; आरपीएफ कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत पकडले

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकावरील रेल्वे तिकीट काऊंटरवर तिकीटसाठी रांगेत उभ्या प्रवाशाची बॅग व मोबाईल हिसकावून पळणाऱ्या एका सराईत चोरट्याला (Kalyan) कल्याण रेल्वे पोलीस व आरपीएफ पथकाने रंगेहाथ (Railway) अटक केली आहे. तोफिक शेख असे या चोरट्याचे नाव असून तोफिक हा सराईत चोरटा असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांनी (Railway Police) दिली. त्याच्याकडून चोरलेली बॅग व मोबाईल हस्तगत केला आहे. (Tajya Batmya)

कल्याण रेल्वे स्थानकावरील रेल्वे तिकीट काऊंटरवर तिकिट घेण्यासाठी एक प्रवासी रांगेत उभा होता. याच दरम्यान एका चोरट्याने या प्रवाशाच्या हातातील बॅग व मोबाईल हिसकावून पळ काढला. प्रवाशांनी आरडा ओरड करताच प्लॅटफॉर्मवर कर्तव्यावर असलेल्या कल्याण जीआरपी व आरपीएफ कर्मचाऱ्यांचे या घटनेकडे लक्ष गेले.

पाठलाग करत पकडले

यसानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत काही अंतरावरच चोरट्याला पकडले. तोफिक शेख असे चोरट्याचे नाव असून सराईत गुन्हेगार असल्याची माहिती तपासात समोर आली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी तो शेख विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याने अशा प्रकारे किती गुन्हे केले त्याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Ladki Bahin Yojana: १२ हजार पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे, सरकारला लावला १६२ कोटींचा चुना, RTI मधून धक्कायदाक माहिती समोर

Actor Passes Away: पडद्यावरचा व्हिलन काळाच्या आड, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

SCROLL FOR NEXT