Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan : शालिमार एक्सप्रेसमधून गांजा तस्करी; साडेआठ किलो गांजासह एकजण ताब्यात

Kalyan News : संशयास्पद हालचाली करत असल्याने गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यानंतर पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे साडेआठ किलो गांजा आढळून आला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : गांजा तस्करी करण्यास बंदी असताना देखील सर्रासपणे गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार शालिमार एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी करत असलेल्या एका आरोपीला आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून तब्बल साडेआठ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. 

कल्याण रेल्वे स्टेशनवर करण्यात आलेल्या या कारवाईत शिराज खलील खान (वय ३४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहे. तर सध्या तो वेल्डिंगच्या कामासाठी ओडिशामध्ये राहत होता. दरम्यान आज पहाटे साडेपाच वाजता शिराज खान हा गांजा घेऊन शालिमार एक्सप्रेसने कल्याण स्टेशनवर उतरला होता. 

संशयास्पद हालचालींवरून पोलिसांना संशय 

स्टेशन परिसरात त्याच्या संशयास्पद हालचाली करत असल्याने गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. यानंतर पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे साडेआठ किलो गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत ६९ हजार रुपये असल्याची माहिती आहे. गांजा आढळून आल्यानंतर आरपीएफ पोलिसांनी शिराज यास ताब्यात घेतले आहे. 

ओडिसा येथून आणला गांजा 

दरम्यान पोलिसांनी त्याची चौकशी केली असता प्राथमिक चौकशीत शिराज खान याने गांजा ओडिसा येथून आणला असून तो घेऊन भिवंडी येथे पोहचवणार असल्याची कबुली दिली आहे. यानंतर त्याला ताब्यात घेतले असून सध्या आरोपीविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पुढील तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : सोनं झालं स्वस्त! प्रति तोळा तब्बल 'इतक्या' रुपयांनी घटले भाव; पाहा आजचे लेटेस्ट रेट्स

Maharashtra News Live Update: चांदोली धरण परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

Mumbai : मुंबईतील धक्कादायक प्रकार, बोगस पदवीने मिळवली सरकारी नोकरी, असं उघड पडलं पितळ

Viral News : अजब लग्नाची गजब गोष्ट! एकत्र राहण्यासाठी ३ सख्ख्या बहिणींनी एकाच नवरदेवाशी केला विवाह

IND vs ZIM: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला विजय; झिम्बाब्वेचा 7 विकेट्सने केला पराभव

SCROLL FOR NEXT