Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

kalyan : कल्याणमध्ये गांजा तस्करी; खडकपाडा पोलिसांनी कारवाई करत तरुणाला घेतले ताब्यात

Kalyan News : प्राथमिक तपासानुसार हा गांजा विक्रीसाठी आणण्यात आला होता. त्यामुळे रवी गवळी विरुद्ध NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: चोरून लपून अजूनही गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अशाच प्रकारे कल्याणमध्ये देखील गांजा तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. यात कल्याण पश्चिम भागातील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 

कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी रवी गवळी (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ११२० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान १७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. योगीधाम- अमृतधाम सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, साई दर्शन ढाब्यासमोर आणि वालधुनी नदीच्या काठावर सापळा रचून रवी शिवाजी गवळी याला ताब्यात घेण्यात आले. 

विक्रीसाठी आणला गांजा 

रवी गवळी हा अनुपमनगर, जयदुर्गे चाळ, खडकपाडा येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा गांजा विक्रीसाठी आणण्यात आला होता. त्यामुळे रवी गवळी विरुद्ध NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

धुळ्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी जिल्ह्याभरामध्ये मिशन ऑल आऊट राबविण्याचे आदेश दिले. यानुसार जिल्ह्याभरामध्ये मिशन ऑल आऊट राबविण्यात आले आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात कारवाया पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आल्या असून तीन पिस्तूल, तीन तलवारी त्याचबरोबर हातभट्टी तसेच मटका व जुगार अड्ड्यांवर देखील कारवाई करण्यात आल्या आहेत. यामध्ये फरार पाच आरोपींच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day Special : स्वातंत्र्यदिन होईल खास! घरीच झटपट बनवा तिरंगा पुलाव

Shocking : विहिरीत आढळला २८ वर्षीय महिलेसह दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह, आत्महत्या की घातपात?

Left Handedness People: डावखुऱ्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण, कसे ओळखावे?

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये 15 ऑगस्टला शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला खाटीक समाजाचा विरोध

Minimum Balance : खातेधारकांनो लक्ष द्या! 'या' तीन बँकांचा नवा नियम लागू, खात्यात 'इतकी' रक्कम नसेल तर लगेच बसणार दंड

SCROLL FOR NEXT