Bhiwandi : भिवंडीत बनावट अमूल बटरचे उत्पादन; कारखान्यावर धाड टाकत दोन जण ताब्यात

Bhiwandi news : कारखान्यावर १७ जुलैला गोदामामध्ये दुपारी अचानक धाड टाकली. त्याठिकाणी अमुल कंपनीचे १०० ग्रॅम तसेच ५०० ग्रॅम वजनाचे बनावट बटर तयार करण्यात येत असल्याचे आढळले
Bhiwandi news
Bhiwandi newsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
भिवंडी
: भिवंडी शहरामध्ये बनावट अमुल बटरचे उत्पादन करण्यात येत होते. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून मोठ्या प्रकरणात बनावट बटरचा साठा आढळून आला असून येथून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष सिरोसिया यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी करणे यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक काळू गवारे व पथकातील पोलिसांसह नागाव भागातील भुसावळ कंपाऊंड,
कासिमपुरा या ठिकाणी एका कारखान्यावर १७ जुलैला गोदामामध्ये दुपारी अचानक धाड टाकली. त्याठिकाणी अमुल कंपनीचे १०० ग्रॅम तसेच ५०० ग्रॅम वजनाचे बनावट बटर तयार करण्यात येत असल्याचे आढळले.

Bhiwandi news
Vasai : वसईत गॅस सिलेंडरचा काळाबाजार; घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचा प्रकार

धाड टाकताच सापडला बटर बनविण्याचे साहित्य 

अन्न व औषध प्रशासनाला त्या ठिकाणी जीशान मुस्ताक अन्सारी व मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद अक्रम हे दोघे रिफाईंड पामोलिन तेल, रिफाईंड वनस्पती तेल, मीठ तसेच बटर फ्लेवर टाकून हँड मिक्सर मशीनच्या सहाय्याने बनावट बटर तयार करीत असल्याचे आढळले. अन्न सुरक्षा अधिकारी करणे यांनी तेथील साहित्यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन त्याठिकाणाहून एकूण १८० पाकिटांसह रिफाइंड पामुलीन तेलाचा ७३.४ किलो तसेच वनस्पती तेलाचा ७३.४ किलो साठा जप्त केला आहे. तसेच बनावट लेबलचे रिकामे पाकिटे, रिकामे कार्टून बॉक्स असा एकूण रुपये १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Bhiwandi news
Sand Mafia : वाळू माफियांची मुजोरी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर चालविला ट्रॅक्टर, पोलीस कर्मचारी गंभीर

दोघांविरोधात गुन्हा दाखल 

याप्रकरणी बनावट बटर तयार करण्या चे काम करणारे दोन्ही आरोपी जीशान मुस्ताक अन्सारी व मोहम्मद मुदस्सिर मोहम्मद अक्रम यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासह त्यांना मदत करणारे इतर संबंधित व्यक्तीं विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलमान्वये शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com