Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News: घरातून पैसे घेऊन घेतला महागडा मोबाईल; वडील रागावले पुढे काय होणार, भीतीपोटी मुलाने उचलले टोकाचे पाऊल

घरातून पैसे घेऊन घेतला महागडा मोबाईल; वडील रागावले पुढे काय होणार, भीतीपोटी मुलाने उचलले टोकाचे पाऊल

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : घरातून कुणालाही न सांगता पैसे घेतले. या पैशांतून महागडा मोबाईल घेतला. वडिलांना याबाबत समजताच त्यांनी विचारणा केली. त्यामुळे घाबरलेल्या मुलाने थेट आत्महत्येचे पाऊल उचलल्याची घटना कल्याणमध्ये घडली. (Kalyan) कल्याणमधील पत्री पूल परिसरात एका झाडाला लटकलेला अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणाने आत्महत्या का केली? या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांचा (Police) तपास सुरू झाला आणि या तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. (Latest Marathi News)

कल्याणमधील पत्रीपुल परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास रेल्वे रुळाशेजारी एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. राजवर्धन यादव (वय १७) असे मुलाचे नाव असून तो व त्याचे कुटुंब उत्तर प्रदेश येथील गाजीपुरला राहतात. राजवर्धन नुकताच बारावी पास झाला होता. त्याला महागडा मोबाईल (Mobile) घ्यायचा होता. म्हणून त्याने कुणालाही न सांगता घरातून पैसे घेतले आणि त्यानंतर उत्तर प्रदेशहून मिरा भाईंदर येथे आपल्या काकाच्या घरी आला आणि त्यानंतर त्या पैशातून आयफोन घेतला.

भीतीपोटी उचलले टोकाचे पाऊल

त्याच्या वडिलांना जेव्हा घरातून पैसे गायब असल्याचे माहित पडले. तेव्हा त्यांनी याबाबत राजवर्धनला विचारणा केली. राजवर्धन घरात कोणालाही न सांगता पैसे आणले होते व महागडा मोबाईल घेतला. त्यामुळे राजवर्धन घाबरला व भीतीपोटी त्याने सोमवारी कल्याण गाठले. रात्रीच्या सुमारास पत्रिपुल परिसरात रेल्वे रुळा लगत असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणे ते बोरिवली प्रवास १५ मिनिटांत होणार, मुख्यमंत्र्यांकडून गेमचेंजर प्रकल्पाचे शुभारंभ, काय आहेत वैशिष्ट्ये?

Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Maharashtra News Live Update: भयंकर! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज ३०० रुपये गुंतवा अन् १५ लाख मिळवा; फक्त व्याजातून मिळणार ४.४० लाख

SCROLL FOR NEXT